January 22, 2026 3:07 PM
120
रणजी क्रिकेट स्पर्धेचा दुसरा टप्पा हैद्राबादच्या राजीव गांधी मैदानात सुरु
रणजी क्रिकेट स्पर्धेचा दुसरा टप्पा आज हैद्राबादच्या राजीव गांधी मैदानात आज सुरु झाला. मुंबई विरुद्ध हैद्राबाद असा हा सामना असून, हैद्राबादनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना उपाहारापर्यंत मुंबईच्या २ बाद ७९ धावा झाल्या आहेत. मुशीर खान ९ तर कर्णधार सिद्धेश लाड ७ धावांवर खेळत आहे.