August 20, 2024 9:45 AM

views 51

देशातल्या विविध शाळांमधल्या विद्यार्थ्यांसोबत राष्ट्रपतींनी साजरा केला राखीपौर्णिमेचा सण

देशभरातल्या विविध शाळांमधल्या विद्यार्थ्यांसोबत राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी काल राखीपौर्णिमेचा सण साजरा केला. 16 राज्यांमध्ये विविध सरकारी शाळांमधल्या 180 विद्यार्थ्यांनी राष्ट्रपतींची भेट घेतल्याची माहिती शिक्षण मंत्रालयाने दिली आहे. या विद्यार्थ्यांना अमृत उद्यानाची सफर घडवून आणल्याची माहितीही मंत्रालयाने दिली. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केल्याबद्दल आणि आशीर्वाद दिल्याबद्दल केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राष्ट्रपती मूर्मू यांचे आभार मानले.

August 19, 2024 7:12 PM

views 64

देशभरात रक्षाबंधनाचा उत्साह

राज्यात रक्षाबंधनाचा सण उत्साहानं साजरा होत आहे. बाजारपेठेत उपलब्ध असलेल्या विविध रंग आणि आकाराच्या राख्यांबरोबरच सामाजिक सद्भावनेचा, पर्यावरण रक्षणाचा संदेश देणाऱ्या राख्याही वापरल्या जात आहेत. विविध राजकीय पक्ष आणि संघटनांनी आज रक्षाबंधनाचे कार्यक्रम आयोजित केले. रक्षाबंधनानिमिमत्त विविध सामाजिक सांस्कृतिक आणि धार्मिक संस्थांच्या प्रतिनिधींनी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची राजभवन मुंबई येथे भेट घेऊन त्यांना राखी बांधली. यावेळी राज्यपालांनी सर्वांना रक्षा बंधनाच्या शुभेच्छा दिल्या. पालघर जिल्ह...

August 16, 2024 1:32 PM

views 44

भारतीय नेव्ही आणि आर्मीच्या सैनिकाच्या हातावर झळकणार पापर्यावरणपूरक राख्या

बहीण भावाच्या प्रेमाची आठवण करून देणारा दिवस म्हणजे राखीपौर्णिमा हा सण. या सणानिमित्त यंदा पालघर जिल्ह्यातल्या विक्रमगडमधल्या टेटवाली, वाकी, जांभा, विळशेत, नडगेपाडा, वाणीपाडा आणि गरदवाडी या सात गावातल्या जवळपास दीडशे  महिला आणि पुरुषांनी मिळून 35 हजार बांबूंच्या राख्या तयार केल्या आहेत.   या पर्यावरणपूरक राख्या  आसाम, पश्चिम  बंगाल, गोहाटी, अरुणाचल प्रदेशमधल्या भारतीय नौदल सैनिकांना तसंच सीमेवरच्या  सैनिकांनाही  पाठवण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे या राख्या सीडपेपर मध्ये देण्यात आलेल्या आहेत...