August 13, 2025 1:02 PM

views 17

राजस्थानमध्ये दौसा जिल्ह्यात आज झालेल्या अपघातात 10 जणांचा मृत्यू

राजस्थानच्या दौसा जिल्ह्यात आज झालेल्या अपघातात १० जणांचा मृत्यू झाला तर ११ जण जखमी झाले आहेत. दौसा मनोहरपूर महामार्गावर बसदी चौराहा इथं आज सकाळी एक टेम्पो आणि ट्रक एकमेकांवर धडकले. मृतांपैकी बहुतेक जण उत्तर प्रदेशातल्या एटाह जिल्ह्यातले रहिवासी होते आणि ते सिकर जिल्ह्यात खाटू श्याम जी मंदिरात दर्शन करून परतत होते.   गंभीर जखमी झालेल्या आठ जणांना जयपूरमधल्या एसएमएस मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आलं आहे. तर इतर तिघांवर दौसा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या अपघा...

June 11, 2025 1:34 PM

views 28

राजस्थानमध्ये रस्ते अपघातात वधू – वरासह ५ जणांचा मृत्यू

राजस्थानमध्ये जयपूरजवळ आज सकाळी झालेल्या अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला, तर इतर सात जण जखमी झाले. यापैकी चौघे गंभीर आहेत. दौसा मनोहरपूर महामार्गावर एक कंटेनर आणि कार याच्यात समोरासमोर टक्कर झाली.   यात कारमधलं नवविवाहित जोडपं आणि त्यांचे कुटुंबीय जागीच ठार झाले. जखमींवर जयपूर इथल्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.