August 2, 2025 8:05 PM

views 56

उद्योगांना जमिनी द्याव्याच लागल्या तर त्या उद्योगात भागिदार घेण्याबाबत ठामपणे सांगा-राज ठाकरे

उद्योगांना जमिनी विकू नका, आमच्या जमिनी घ्यायच्याच असतील तर आम्हाला उद्योगात पार्टनर म्हणून घेण्याबाबत ठामपणे सांगा, असं आवाहन मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केलं आहे. ते आज रायगड जिल्ह्यात शेतकरी कामगार पक्षाच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मेळाव्यात बोलत होते. भाषा आणि जमिनी जपल्या पाहिजेत, एकदा तुमची भाषा आणि जमीन गेली की तुम्हाला जगाच्या पाठीवर कुठेही स्थान नाही असं ते म्हणाले. सरकारच्या हिंदी सक्तीच्या निर्णयावर तसंच जनसुरक्षा कायद्यावर ठाकरे यांनी जोरदार टीका केली. मराठी माणसाच्या थडग्...

July 1, 2025 3:19 PM

views 95

मराठीच्या मुद्द्यावर शनिवारी मुंबईत होणाऱ्या मेळाव्यात उद्धव आणि राज ठाकरे सहभागी होणार

राज्य सरकारनं हिंदी सक्तीचा शासन निर्णय मागे घेतल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष संयुक्तपणे विजयी मेळावा घेणार आहेत.   दोन्ही पक्षांनी आपल्या अधिकृत समाज माध्यमावर याविषयी माहिती दिली आहे. मुंबईत वरळी इथं येत्या शनिवारी आयेजित या विजयी मेळाव्याला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत.

November 15, 2024 6:59 PM

views 43

मनसे पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाचा जाहीरनामा आज प्रकाशित केला. जाहिरनाम्याच्या पहिल्या भागात मूलभूत गरजा, दुसऱ्या भागात दळणवळण, वीज, पाणी नियोजन, घनकचरा व्यवस्थापन, पर्यावरण जैवविविधता यांचा समावेश करण्यात आला आहे. तिसऱ्या भागात प्रगतीच्या संधी आणि राज्याचं  कृषी धोरण आणि चौथ्या भागात मराठी अस्मिता हा विषय घेण्यात आल्याचं राज ठाकरे यांनी यावेळी सांगितलं. जाहीरनामा प्रसिद्ध करताना अनेकांनी आम्ही काय करू इतकच दिलं  आहे. पण, आमच्या जाहीरन...