November 14, 2024 7:36 PM

views 58

केंद्र सरकार आदिवासी समुदायाला संसाधनापासून दूर ठेवत असल्याचा राहुल गांधी यांचा आरोप

केंद्र सरकारच्या धोरणनिर्मितीत आदिवासी अधिकाऱ्यांना मर्यादित अधिकार असून आदिवासी समुदायाला संसाधनापासून दूर ठेवलं जातं, असा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी केला. ते आज नंदुरबार इथं प्रचारसभेत बोलत होते. देशात आदिवासींची लोकसंख्या ८ टक्के आहे, मात्र त्यांना सोयी सुविधा नाकारल्या जातात. ही परिस्थिती बदलायची असेल तर जातनिहाय जनगणना करावी लागेल, असं गांधी म्हणाले. प्रत्येक समुदायाच्या संख्येनुसार त्यांची भागीदारी सुनिश्चित केली जाईल, आरक्षणाची ५० टक्क्याची मर्यादा काढून टाकली जाईल, शे...

November 12, 2024 7:46 PM

views 56

उद्योगपतींच्या माफ झालेल्या कर्जाइतकी रक्कम राज्याला देण्याचं राहुल गांधी यांचं आश्वासन

उद्योगपतींच्या माफ झालेल्या कर्जांच्या इतका पैसा राज्यातले शेतकरी, कष्टकरी आणि गरिबांना देण्याचं आश्वासन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिलं आहे. गोंदिया इथल्या प्रचारसभेत ते बोलत होते. आम्हाला अरबपतींचा नाही तर शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा, तरुणांचा भारत हवा आहे, असं ते म्हणाले. देशात सर्वाधिक जीएसटी गरीबांच्या खिशातून जातो, असा दावाही त्यांनी केला.    विविध समाज घटकांना देशाच्या निर्णयप्रक्रियेत, तसंच विविध क्षेत्रांमध्ये योग्य प्रतिनिधित्व मिळत नाही. हा या समुदायांचा सर्वात मोठा अपमान असल्...

November 11, 2024 7:44 PM

views 49

राहुल गांधी अपप्रचार करत असल्याची भाजपाची निवडणूक आयोगाकडे तक्रार

राज्यातल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस नेते राहुल गांधी अपप्रचार करत आहेत. त्यामुळं त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी भाजपाने आज केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली. गांधी यांनी भाजपावर राज्यघटना नष्ट करत असल्याचा खोटा आरोप करत तणाव निर्माण केल्याचं त्यांनी या तक्रारीत म्हटलं असून आयोगाने यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. गेल्या आठवड्यात मुंबईत झालेल्या सभेदरम्यान राहुल गांधी यांच्या भाषणाचा संदर्भ देऊन त्यांना आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप भाजपाने केला आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते अर्जु...

November 8, 2024 8:04 PM

views 25

भाजप आदिवासींकडून जल, जंगल, जमीनीवरचा हक्क हिरावून घेत असल्याचा राहुल गांधी यांचा आरोप

भारतीय जनता पक्ष आदिवासींकडून जल, जंगल, जमीनीवरचा हक्क हिरावून घेत असल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी सिमदेगा इथं आयोजित प्रचारसभेत आज ते बोलत होते. झारखंडची निवडणूक म्हणजे इंडिया आघाडीचं भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तत्वज्ञानाविरुद्धचं युद्ध आहे असं ते म्हणाले. जातनिहाय जनगणना आणि आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांच्या वर नेण्याचं आश्वासन त्यांनी दिलं.

November 6, 2024 6:47 PM

views 44

राहुल गांधी काँग्रेस विचारसरणीचे राहिले नसून अतिडावे बनल्याची फडणवीसांची टिका

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याभोवती अर्बन नक्षलींचा गराडा पडल्यामुळे ते आता काँग्रेस विचारसरणीचे राहिले नसून, अतिडावे बनल्याची टीका, भाजपचे ज्येष्ठ नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ते आज एका मुलाखतीमध्‍ये बोलत होते. भारतीय संविधानाची प्रत पारंपारिक निळ्या कव्‍हरमध्‍ये असते, मात्र राहुल गांधी भारतीय संविधानाची प्रत लाल रंगाचं कव्‍हर घातलेली का दाखवतात, असा प्रश्नही त्यांनी केला. भारत जोडो यात्रेत सहभागी झालेल्‍या १८० संघटना विध्‍वंसक कृत्‍यात सहभागी असणाऱ्या होत्‍या, असा आरोप...

November 6, 2024 7:56 PM

views 42

भारतीय राज्यघटना हा फक्त ग्रंथ नसून जगण्याचा मार्ग आहे – राहुल गांधी

काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी आज नागपूर इथं संविधान संमेलनात सहभागी झाले होते. संविधान हे केवळ एक पुस्तक नसून, जीवन जगण्याचं माध्यम आणि तत्वज्ञान आहे, असं त्यांनी यावेळी नमूद केलं. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विकास, प्रगती, अर्थव्यवस्था अशा शब्दांच्या आडून राज्यघटनेवर हल्ला करतात, असा आरोप त्यांनी केला. जाती आधारित जनगणना हा लोकांचा आवाज असून, तो संसदेपर्यंत पोहोचवणं हे माझं काम आहे, असंही राहुल गांधी म्हणाले. तत्पूर्वी त्यांनी, नागपूर इथल्या दीक्षाभूमीत डॉक्टर बाब...

November 3, 2024 7:13 PM

views 75

वायनाड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज जाहीर सभा घेतली

केरळमधल्या वायनाड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस उमेदवार प्रियांका गांधी आणि लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज जाहीर सभा घेतली. प्रियांका गांधी कोरोम आणि थरिओडे इथंही प्रचारसभा घेणार आहेत. तर राहुल गांधी अरीकोड इथं प्रचारसभा घेणार आहेत.   एलडीएफचे उमेदवार सत्यन मोकेरी यांनी तिरुवंबडी भागात प्रचार केला, तर राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार नव्या हरिदास यांनी कलपेट्टा इथं घरोघरी जाऊन प्रचार केला.  

November 3, 2024 3:58 PM

views 42

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी येत्या ६ तारखेला नागपूरात संविधान संमेलनाला उपस्थित राहणार

भारताचे संविधान हेच सर्वोच्च आहे. मनुस्मृती विरोधात काँग्रेसची लढाई सुरुच आहे. त्यामुळे संविधान वाचवण्यासाठी लढा उभारणे काळाची गरज आहे. हा लढा अधिक बुलंद करण्यासाठी विदर्भातील सामाजिक संस्थानी नागपूर इथे येत्या ६ तारखेला संविधान संमेलन आयोजित करण्यात आलं असून या संमेलनाला लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी उपस्थित राहणार असल्याची माहिती विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. महाराष्ट्रातील विविध सामाजिक संघटना कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. मान्यवर यात आपले वि...

October 13, 2024 8:19 PM

views 44

विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा अग्निवीर योजनेवर पुन्हा प्रश्नचिन्ह

लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अग्निवीर योजनेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केलं असून ही योजना म्हणजे आपल्या वीर जवानांच्या बलिदानाचा अपमान असल्याचं म्हटलं आहे. नाशिक मध्ये प्रशिक्षणादरम्यान दोन अग्निवीरांचा मृत्यू झाल्याच्या घटनेच्या संदर्भात ते बोलत होते. लष्करी सेवेतल्या इतर जवानांप्रमाणे या दोघांच्या कुटुंबांना सरकारकडून नुकसान भरपाई मिळणार का? असा सवाल त्यांनी केला. 

October 5, 2024 7:37 PM

views 49

आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवणं आणि देशात जातनिहाय जनगणना करण्याचं लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचं आश्वासन

आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवणं आणि देशात जातनिहाय जनगणना करण्याचं आश्वासन लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज दिलं आहे. राज्यघटना वाचवण्यासाठी हे दोन सर्वांत महत्त्वाचे मार्ग असल्याचं त्यांनी कोल्हापूर इथं संविधान सन्मान संमेलनात सांगितलं. जातनिहाय जनगणना हा देशाचा एक्स-रे आहे आणि यासंबंधीचा कायदा आम्ही संसदेत मंजूर करून दाखवू, अशी ग्वाही त्यांनी दिली.    तत्पूर्वी, कोल्हापुरातल्या कसबा बावडा इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण राहुल गांधी यांनी केलं. छत्रपती ...