October 18, 2024 6:34 PM

views 39

पुणे शहरात अवजड वाहनांवर घातलेल्या बंदीची कठोर अंमलबजावणी सुरू

पुणे शहरात वर्दळीच्या कालावधीत अवजड वाहनांवर घातलेल्या बंदीची वाहतूक पोलिसांनी कठोर अंमलबजावणी सुरू केली आहे. तसंच बेशिस्त वाहनचालकांवर वचक ठेवण्यासाठी वाहतूक शाखेने कारवाईचा बडगा उगारला आहे.  ट्रिपल सीट, ड्रंक ॲण्ड ड्राईव्ह आणि विरुद्ध दिशेनं येणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध ही कारवाई केली जात आहे.  गेल्या १५ दिवसांत सुमारे २५ हजार वाहनचालकांवर झाली असून, विरुद्ध दिशेनं येणाऱ्या दोनशेहून अधिक वाहनं जप्त केली आहेत.