February 28, 2025 7:35 PM

views 59

स्वारगेट बस स्थानक बलात्कार प्रकरणातल्या आरोपीला पोलीस कोठडी

पुण्यातल्या स्वारगेट बस स्थानक महिला अत्याचार प्रकरणी आरोपी दत्तात्रय गाडे याला न्यायालयानं १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. मध्यरात्री त्याला शिरूर तालुक्यातल्या गुनाट गावातून अटक केली होती. हे प्रकरण द्रुतगती न्यायालयात चालवलं जाईल, अशी माहिती पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.

February 27, 2025 12:44 PM

views 88

पुणे बलात्कार प्रकरणातल्या आरोपीची माहिती देणाऱ्याला बक्षीस जाहीर

पुण्यातल्या स्वारगेट बस स्थानकातल्या बलात्कार प्रकरणातल्या आरोपीची माहिती देणाऱ्याला एक लाख रुपयांचं बक्षीस पुणे पोलिसांनी जाहीर केलं आहे. या प्रकरणातला आरोपी मंगळवारपासून फरार असून त्याला शोधण्यासाठी १३ पथकं कामाला लागली असल्याचं पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं. आरोपीची माहिती देणाऱ्याची ओळक गुप्त ठेवली  जाईल असंही त्यांनी सांगितलं. 

December 30, 2024 7:40 PM

views 43

कोरेगाव भीमा इथल्या विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यानिमित्त पोलीस तैनात

येत्या १ जानेवारीला कोरेगाव भीमा इथल्या विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यानिमित्त होणारी गर्दी लक्षात घेऊन, पुणे ग्रामीण पोलिसांद्वारा चोख बंदोबस्त राखला जाणार आहे. वाहतुक आणि गर्दीच्या नियोजनासाठी ८०० पोलीस कर्मचारी तैनात करणार असल्याचं पुणे ग्रामीण पोलीसांनी कळवलं आहे.  बंदोबस्तात तैनात करण्यात येणार आहे. यासोबतच सोहळ्याच्या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी घातपात विरोधी पथकही तैनात केलं जाणार असल्याचं पोलीस प्रशासनानं कळवलं आहे. कोरेगाव भिमा परिसरात 45 ठिकाणी वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली आह...