February 28, 2025 7:35 PM

views 59

स्वारगेट बस स्थानक बलात्कार प्रकरणातल्या आरोपीला पोलीस कोठडी

पुण्यातल्या स्वारगेट बस स्थानक महिला अत्याचार प्रकरणी आरोपी दत्तात्रय गाडे याला न्यायालयानं १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. मध्यरात्री त्याला शिरूर तालुक्यातल्या गुनाट गावातून अटक केली होती. हे प्रकरण द्रुतगती न्यायालयात चालवलं जाईल, अशी माहिती पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.

February 28, 2025 4:04 PM

views 50

Pune Crime : स्वारगेट बस स्थानक बलात्कार प्रकरणातल्या आरोपीला अटक

पुण्यातल्या स्वारगेट बस स्थानक बलात्कार प्रकरणातला आरोपी दत्ता गाडेला  आज पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी अटक केली. शिरूर तालुक्यातल्या कनाट गावातल्या ग्रामस्थांनी पोलिसांना मदत केली. त्याला आज न्यायालयात हजर केलं जाईल. हा खटला जलदगती न्यायालयात चालवणार असल्याचं पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितलं.   

February 27, 2025 12:44 PM

views 88

पुणे बलात्कार प्रकरणातल्या आरोपीची माहिती देणाऱ्याला बक्षीस जाहीर

पुण्यातल्या स्वारगेट बस स्थानकातल्या बलात्कार प्रकरणातल्या आरोपीची माहिती देणाऱ्याला एक लाख रुपयांचं बक्षीस पुणे पोलिसांनी जाहीर केलं आहे. या प्रकरणातला आरोपी मंगळवारपासून फरार असून त्याला शोधण्यासाठी १३ पथकं कामाला लागली असल्याचं पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं. आरोपीची माहिती देणाऱ्याची ओळक गुप्त ठेवली  जाईल असंही त्यांनी सांगितलं.