January 16, 2025 8:19 PM

views 79

इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियांतो प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे प्रमुख अतिथी

७६ व्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियांतो उपस्थित राहणार आहेत. २५ आणि २६ जानेवारी रोजी ते भारत दौऱ्यावर येतील. ऑक्टोबर २०२४ मध्ये राष्ट्राध्यक्षपदाची सुत्रं हाती घेतल्यानंतर त्यांची ही पहिलीच भारत भेट आहे. या भेटीत दोन्ही देशांच्या संबंधावर द्विपक्षीय चर्चा होण्याची शक्यता आहे.

October 20, 2024 8:35 PM

views 89

इंडोनेशियाचे नवे राष्ट्रपती म्हणून प्राबोवो सुबियांतो यांनी पदभार स्वीकारला

इंडोनेशियाचे नवे राष्ट्रपती म्हणून प्राबोवो सुबियांतो यांनी पदभार स्वीकारला आहे. इंडोनेशिया जगातली तिसरी मोठी लोकशाही असून  ७३ वर्षांचे प्राबोवो सुबियांतो इंडोनेशियाचे आठवे राष्ट्रपती बनले आहेत.  विशेष दलांचे माजी कमांडर असलेल्या प्राबोवो सुबियांतो यांना १४ फेब्रुवारीला झालेल्या निवडणुकीत जवळपास ६० टक्के मतं मिळाली.

October 20, 2024 1:37 PM

views 52

इंडोनेशियाचे नवे राष्ट्रपती प्राबोवो सुबियांतो यांनी पदभार स्वीकारला