March 27, 2025 8:00 PM

views 85

Porsche Car Accident : दोषी निलंबित पोलीस अधिकारी बडतर्फ होणार ?

पुण्यातल्या कल्याणीनगर पोर्शे अपघात प्रकरणात दोषी आढळलेल्या दोन निलंबित पोलीस अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्याचा प्रस्ताव पुणे पोलिसांनी 'पोलीस महासंचालक' कार्यालयाकडे पाठवला आहे. पोलीस निरीक्षक राहुल जगदाळे, आणि सहाय्यक निरीक्षक विश्वास तोडकरी अशी या दोन अधिकाऱ्यांची नावं आहेत. निलंबनानंतर त्यांची विभागीय चौकशी सुरू होती. त्यात दोघे दोषी आढळले.    या प्रकरणात अल्पवयीन मुलाचे आई-वडिल, ससूनचे दोन डॉक्टर यांच्यासह दहा जणांना अटक केली. तेव्हापासून सर्वजण अद्याप कारागृहात आहेत. त्यांना जामीन मिळालेला...

September 20, 2024 7:12 PM

views 83

जालना जिल्ह्यात ट्रक आणि बसची टक्कर होऊन ६ जणांचा मृत्यू

जालना जिल्ह्यात मठतांडा गावाजवळ आज एक एसटी बस आणि ट्रकची टक्कर होऊन झालेल्या अपघातात सहाजण ठार, तर २३ जण जखमी झाले. जालना-वडीगोद्री महामार्गावर सकाळी साडेआठच्या सुमाराला हा अपघात झाला. ही बस गेवराईहून जालन्याकडे निघाली असताना, समोरुन येत असलेला ट्रक या बसला धडकला.   त्यात बसचा वाहक आणि तीन प्रवासी, तसंच ट्रकचा चालक, आणि वाहक, असे सहाजण जागीच ठार झाले. जखमींपैकी १३ जणांवर जालना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यापैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे.

June 25, 2024 8:05 PM

views 64

पुणे पोर्शे प्रकरण : अल्पवयीन आरोपीची बालसुधारगृहातून सुटका करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश

पुणे पोर्श कार अपघात प्रकरणातल्या अल्पवयीन आरोपीची बालसुधारगृहातून तत्काळ सुटका करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत.   बाल न्याय मंडळानं आरोपीची बालसुधारगृहात रवानगी करण्याचे आदेश दिले होते. या आदेशाला आव्हान देत आरोपीच्या आत्यानं उच्च न्यायालयात हेबियस कॉर्पस याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज न्यायमूर्ती भारती डांगरे आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. अल्पवयीन मुलाला जामीन मंजूर झाल्यानंतर त्याला ताब्यात घेणं बेकायदेशीर आहे, असा युक्तिवाद यावेळ...