December 26, 2025 7:21 PM

views 161

पुण्याचे माजी महापौर प्रशांत जगताप यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

पुण्याचे माजी महापौर आणि नुकताच राजीनामा दिलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पक्षाच्या पुण्यातल्या अनेक पदाधिकाऱ्यांसह आज काँग्रेसमधे प्रवेश केला. मुंबईत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जगताप आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं पक्षात स्वागत केलं.    नगरपालिका निवडणुकीत काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष विजयी झाले, त्यांचा सत्कारही यावेळी करण्यात आला. आगामी महापालिका निवडणुकीसाठी ‘काँग्रेस लढणार, महाराष्ट्र जिंकणार’, या टॅगलाईनचं आणि टिझरचं प्रकाशनही करण्...