January 23, 2026 7:31 PM

views 78

महाराष्ट्र सदन घोटाळ्यात छगन भुजबळ PMLA न्यायालयाकडून दोषमुक्त

नवी दिल्लीतल्या महाराष्ट्र सदन कथित घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री छगन भुजबळ यांना मुंबईतल्या PMLA न्यायालयानं आज दोषमुक्त केलं. नवी दिल्लीत महाराष्ट्र सदन बांधण्यासाठी काढलेला मूळचा खर्चाचा अंदाज नंतर सुमारे चौपट वाढवल्याचा, आणि संबंधित कंत्राटदाराकडून लाच घेतल्याचा आरोप इडी, अर्थात सक्तवसूली महासंचालनालयानं ठेवला होता. २००५-६ मधल्या व्यवहाराचं हे प्रकरण आहे. भुजबळ त्यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं दाखल केलेल्या FIR च्या आधारावर ईडीनं, ...