September 17, 2025 10:02 AM

views 33

प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आज मध्यप्रदेशात धार इथं “स्वस्थ नारी सशक्त परिवार” अभियानाचा प्रारंभ

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांच्या हस्ते दुपारी धार इथं "स्वस्थ नारी सशक्त परिवार" आणि "8 व्या राष्ट्रीय पोषण माह" अभियानाला प्रारंभ होणार आहेत. ही मोहीम आजपासून दोन ऑक्टोबर पर्यंत सुरू राहील. या कालावधीत देशभरातली आयुष्मान आरोग्य मंदिरं, सामुदायिक आरोग्य केंद्रं, जिल्हा रुग्णालये आणि इतर सरकारी आरोग्य सुविधा केंद्रांमध्ये आयोजित केली जाणार आहे.   या मोहिमेद्वारे देशभरात रक्तदान मोहीम देखील राबवली जाईल तसेच दात्यांची नोंद ई-रक्तकोष पोर्टलवर करण्यात य...