January 23, 2026 12:29 PM

views 87

प्रधानमंत्र्यांच्या हस्ते केरळमधल्या विविध विकासकामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन होणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज केरळमधल्या थिरुवनंतपुरममध्ये विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करणार आहेत. यावेळी ते उपस्थित नागरिकांना संबोधित करतील. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते तीन अमृत भारत एक्सप्रेस रेल्वे आणि एका प्रवासी रेल्वेचंही उद्घाटन होणार आहे. शहरी उपजीविका सुलभ होण्यासाठी प्रधानमंत्री आज पीएम स्वनिधी क्रेडिट कार्ड योजना सुरू करणार आहेत तसंच केरळ मधल्या रस्त्यावरील विक्रेत्यांसह, १ लाख लाभार्थ्यांसाठी पीएम स्वनिधि कर्जाचं वितरण करणार आहेत. त्यांच्या हस्ते तिरुवनंतपूरममधल्या नवो...

January 19, 2026 1:40 PM

views 66

‘बोर्ड ऑफ पीस’मध्ये सहभागी होण्यासाठी अमेरिकेचं प्रधानमंत्र्यांना आमंत्रण

इस्रायल आणि पॅलेस्टाईन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर गाझामध्ये कायमस्वरुपी शांतता प्रस्थापित करण्याच्या दिशेनं काम करण्याच्या उद्देशानं निर्माण करण्यात आलेल्या गटात अर्थात 'बोर्ड ऑफ पीस'मध्ये सहभागी होण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना आमंत्रित केलं आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी या संदर्भात मोदी यांना पत्र पाठवलं आहे, अमेरिकेचे भारतातले राजदूत सर्जियो गोर यांनी हे पत्र समाजमाध्यमावर शेअर केलं आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी गाझा पट्टीत इस...

January 17, 2026 7:23 PM

views 120

देशातील पहिल्या वंदे भारत शयनयान रेल्वेला प्रधानमंत्र्यांकडून हिरवा झेंडा

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगाल आणि ईशान्य भारतात विकासकामांना वेग देणाऱ्या ३ हजार २५० कोटी रुपये खर्चाच्या विविध रस्ते आणि रेल्वे पायाभूत प्रकल्पांचं आज उदघाटन केलं.    मालदा रेल्वे स्थानकातून हावडा, गुवाहाटी आणि कामाख्या दरम्यान धावणाऱ्या देशातील पहिल्या वंदे भारत शयनयान रेल्वेलाही आज दुरदृश्य प्रणालीद्वारे हिरवा झेंडा दाखवला. त्याबरोबरच चार आधुनिक अमृत भारत एक्सप्रेस रेल्वेगाड्यांनाही प्रधानमंत्र्यांनी हिरवा झेंडा दाखवला. शयनयान वंदे भारत रेल्वे पूर्णपणे वातानुकूलित असून प्र...

January 12, 2026 1:16 PM

views 74

जर्मनीशी मैत्री आणि भागीदारी आणखी मजबूत करण्यासाठी वचनबद्ध – प्रधानमंत्री

भारत जर्मनीशी मैत्री आणि भागीदारी आणखी मजबूत करण्यासाठी वचनबद्ध आहे, असं प्रतिपादन आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. ते आज अहमदाबाद इथे जर्मनीचे चान्सलर फ्रेडरिक मर्झ यांच्यासह संयुक्त पत्रकार परिषदेत बोलत होते. भारत आणि जर्मनीने आपल्या धोरणात्मक भागीदारीची २५ वर्षं पूर्ण केली असून यंदा दोन्ही देशांच्या राजनैतिक संबंधांना ७५ वर्षं पूर्ण होत आहेत. हे टप्पे सामायिक महत्त्वाकांक्षा, परस्पर विश्वास आणि सहकार्याला सातत्याने बळकटी देणारे आहेत, असंही मोदी म्हणाले.    तत्पूर्वी प्रधानमंत्री नरेंद...

December 25, 2025 1:51 PM

views 50

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा खासदार क्रीडामहोत्सवातल्या खेळाडूंशी संवाद

संसद खेल महोत्सव देशाच्या उभारणीत महत्त्वाची भूमिका बजावत असून खेळामुळे जय-पराजयाच्या पलीकडे जात तरुणांमधे खिलाडूवृत्ती रुजत असल्यामुळे सक्षम आणि शिस्तबद्ध तरूण घडत आहेत, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. संसद खेल महोत्सवाचं दूरस्थ पद्धतीने उद्घाटन केल्यानंतर ते आज बोलत होते. हेच तरूण पुढे राष्ट्र उभारणीत योगदान देणार आहेत, असं प्रधानमंत्री म्हणाले. संसद खेल महोत्सवामुळे देशाला हजारो खेळाडू मिळाले असून या महोत्सवाची व्याप्ती आणि प्रभाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे, असं प्रधानमंत्र...

December 19, 2025 1:32 PM

views 70

प्रधानमंत्र्यांच्या हस्ते अनेक आयुष उपक्रमांचा प्रारंभ होणार

पारंपरिक औषधशास्त्रावर नवी दिल्लीत सुरू असलेल्या जागतिक आरोग्य संघटनेच्या आंतरराष्ट्रीय शिखर परिषदेचा आज समारोप होणार आहे. या समारोप समारंभात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनेक आयुष उपक्रमांचा प्रारंभ केला जाणार आहे. माय आयुष सर्वसमावेशक सेवा पोर्टल, आयुष मार्क या प्रमाणिकरणाचा यामधे समावेश आहे. या कार्यक्रमात२०२१ ते २०२५ या काळात योग प्रसार आणि विकासामध्ये उल्लेखनीय काम केलेल्या व्यक्तींना प्रधानमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार दिला जाणार आहे.  

December 15, 2025 7:22 PM

views 69

प्रधानमंत्री मोदी जॉर्डनची राजधानी अम्मान इथं पोहोचले

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज तीन देशांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात जॉर्डनची राजधानी अम्मान इथं पोहोचले. जॉर्डनचे प्रधानमंत्री जाफर हसन यांनी विमानतळावर त्यांचं स्वागत केलं. अम्मान इथल्या भारतीय समुदायानं केलेल्या स्वागताबद्दल प्रधानमंत्री मोदी यांनी समाजमाध्यमाद्वारे त्यांचे आभार मानले. जॉर्डनचे राजे अब्दुल्ला दुसरे इब्न अल हुसैन यांच्या निमंत्रणावरून ते जॉर्डनला भेट देत आहेत. यादरम्यान राजे अब्दुल्ला आणि प्रधानमंत्री जाफर हसन यांच्याशी प्रधानमंत्री मोदी सखोल द्विपक्षीय चर्चा करतील, तसंच जॉर...

December 9, 2025 9:55 AM

views 102

वंदे मातरम हे भारतीयांच्या संकटांशी सामना करण्याच्या ताकदीचं प्रतीक – प्रधानमंत्री

भारत आणि भारतीयांमध्ये प्रत्येक प्रश्न, प्रत्येक संकटाचा सामना करण्याची ताकद आहे, आणि वंदे मातरम् हे गीत त्या ताकदीचं प्रतीक आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल लोकसभेत केलं. 'वंदे मातरम्' या राष्ट्रीय गीताला दीडशे वर्षं पूर्ण झाल्यानिमित्त लोकसभेत एक विशेष चर्चा झाली, त्यावेळी मोदी बोलत होते. 'वंदे मातरम्' हे केवळ एक गीत नाही, तर ते भारतीयांच्या मनात वसलेलं समृद्ध भारताचं चित्र आहे, असं मोदी म्हणाले.   यावेळी प्रधानमंत्र्यांनी वंदे मातरमच्या दीडशे वर्षांच्या इतिहासाचा मा...

November 30, 2025 7:45 PM

views 76

संवेदनशीलता, प्रतिसाद देण्याची क्षमता आणि व्यावसायिकता वाढवून लोकांची पोलिसांबद्दलची धारणा बदलण्याची गरज – प्रधानमंत्री

संवेदनशीलता, प्रतिसाद देण्याची क्षमता आणि व्यावसायिकता वाढवून लोकांची पोलिसांबद्दलची धारणा बदलण्याची गरज असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. रायपूर इथं पोलीस महासंचालकांच्या ६० व्या अखिल भारतीय परिषदेत अध्यक्षस्थानावरून बोलत होते. नव्या फौजदारी कायद्यांबाबत जनजागृती करण्याची गरजही त्यांनी यावेळी व्यक्त केली. निर्जन बेटांना एकत्र जोडण्यासाठी नाविन्यपूर्ण धोरणं राबवा, NATGRID अंतर्गत एकत्रित केलेल्या डेटाबेसचा वापर करा, आणि कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर करून या प्रणाली एकमेका...

November 28, 2025 1:19 PM

views 78

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी कर्नाटक आणि गोवा दौऱ्यावर

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज कर्नाटक आणि गोवा दौऱ्यावर आहेत. कर्नाटकात उडुपी इथल्या श्रीकृष्ण मठाला त्यांनी भेट दिली आणि पूजा अर्चना केली. गर्भगृहासमोरच्या सुवर्ण तीर्थ मंडपाचं उद्घाटन करुन नंतर त्यांनी संत कनकदास यांच्या  पवित्र खिडकीला सुवर्ण कवच अर्पण केलं. या खिडकीतून कनकदासांना भगवान कृष्णांचं दर्शन झालं होतं असं मानलं जातं. त्यानंतर आयोजित लक्ष कंठ गीता पठण कार्यक्रमात प्रधानमंत्री सहभागी झाले.    प्रधानमंत्री नंतर  गोव्याला जाणार असून  पर्तगळी इथं प्रभू श्री रामांच्या  ७७ फूट उंच कां...