February 20, 2025 1:37 PM

views 37

पाटणा इथं आजपासून रजत महोत्सव साजरा

भारतीय कृषी संशोधन परिषदेचा पूर्व क्षेत्र संशोधन परिसर, बिहारमधल्या पाटणा इथं आजपासून आपला  रजत महोत्सव साजरा करत आहे. येत्या शनिवारी साजऱ्या केल्या जाणाऱ्या स्थापना दिन विशेष कार्यक्रमात, विशेष करून महिलांसाठी तयार करण्यात आलेल्या एकीकृत शेती मॉडेलचं उद्घाटन होणार आहे. हे मॉडेल पोषणासंबंधी आवश्यकता पूर्ण करण्यासोबतच महिलांना वर्षभरासाठी उत्पन्नाचं साधन देखील उपलब्ध करून देईल, अशी माहिती या संस्थेच्या संचालकांनी दिली.

January 5, 2025 9:28 AM

views 28

बिहारमध्ये गुरु गोविंद सिंगजी यांच्या ३५८व्या जयंतीनिमित्त तीन दिवसीय प्रकाश उत्सव

बिहारमधील पाटणा शहरातील तख्त श्री हरमंदिर साहिब इथं शीख समुदायाचे १०वे आणि शेवटचे शीखगुरू गुरु गोविंद सिंगजी यांच्या ३५८व्या जयंतीनिमित्त तीन दिवसीय प्रकाश उत्सव सोहळ्याला काल सुरुवात झाली. तख्त श्री हरमंदिर साहिब हे गुरु गोविंद सिंगजी यांचं जन्मस्थान आहे. यानिमित्तानं आज भव्य नगर कीर्तन अर्थात मिरवणूक काढण्यात येणार असून त्याची सांगता तख्त श्री हरमंदिर साहिब इथं होणार आहे. प्रकाश पर्वचा मुख्य सोहळा उद्या मध्यरात्री गुरु ग्रंथसाहिबच्या पवित्र श्लोकांचे पठण आणि फटाक्यांच्या आतषबाजीत साजरा केला जा...