December 19, 2025 8:04 PM

views 90

संसदेचं हिवाळी अधिवेशन संस्थगित

संसदेचं हिवाळी अधिवेशन आज संस्थगित झालं. विकसित भारत जी राम जी विधेयक, शाश्वत अणुऊर्जा विकास विधेयक, सबका बिमा, सबकी रक्षा विधेयक, निरस्तीकरण आणि दुरुस्ती विधेयक इत्यादी महत्त्वाची विधेयकं संसदेनं या सत्रात मंजूर केली. तसंच, पुरवणी मागण्यांच्या पहिल्या टप्प्यात १ लाख ३२ हजार कोटी रुपयांच्या खर्चालाही संसदेनं हिरवा कंदील दाखवला.   हिवाळी अधिवेशनाच्या काळात लोकसभेच्या १५ बैठका झाल्या आणि १११ टक्के विधायक कामकाज झालं, अशी माहिती लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी सभागृहाचं कामकाज संस्थगित करण्याप...

December 16, 2025 1:14 PM

views 91

लोकसभेत ‘सबका बीमा सबकी रक्षा विधेयक, २०२५’ सादर

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत 'सबका बीमा सबकी रक्षा विधेयक, २०२५' सादर केलं. हे विधेयक विमा कायदा १९३८, भारतीय आयुर्विमा महामंडळ कायदा, १९५६ आणि विमा नियामक आणि विकास प्राधिकरण कायदा, १९९९ यांची सुधारित आवृत्ती आहे. हे विधेयक सभागृहात सादर केलं जात असताना, द्रमुक आणि तृणमूल काँग्रेससह विरोधी पक्षांनी विधेयकाला विरोध केला.   प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत आजपर्यंत एकूण ७ लाख ८६ हजार किलोमीटरपेक्षा जास्त लांबीचे ग्रामीण रस्ते बांधण्यात आल्याची माहिती ग्रामविकास राज्यमंत्री ...