December 13, 2024 2:48 PM

views 29

संसद हल्ल्यातल्या शहिदांना आज संसदेच्या दोन्ही सभागृहात आदरांजली

संसद हल्ल्यातल्या शहिदांना आज संसदेच्या दोन्ही सभागृहात आदरांजली वाहण्यात आली. दोन्ही सदनात मौन पाळून शहिदांना अभिवादन करण्यात आलं. शहिदांचं साहस आणि समर्पण वृत्तीला देश कधीच विसरू शकणार नाही असं लोकसभेचं सभापती ओम बिर्ला यांनी सांगितलं. दहशतवादाचा मुकाबला करण्याच्या देशाच्या अढळ संकल्पाचा त्यांनी पुनरुच्चार केला. तर दहशतवाद्यांचा मनसुबा उधळून लावत आपल्या शूर सुरक्षारक्षकांनी अतुलनीय साहस दाखवलं असं राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांनी सांगितलं. आपलं ऐक्य, न्याय आणि स्वातंत्र्य यांच्या रक्षणासाठी...