August 13, 2026 8:00 PM

views 590

संसदेचं पावसाळी अधिवेशन संस्थगित, लोकसभेत १९ टक्के तर राज्यसभेत ३९ टक्के कामकाज

   गेल्या २० तारखेपासून सुरू झालेलं संसदेचं पावसाळी अधिवेशन आज संस्थगित झालं. या अधिवेशनात लोकसभेत १९ टक्के तर राज्यसभेत ३९ टक्के कामकाज झालं.

August 6, 2026 5:19 PM

views 25

विद्यार्थी आंदोलनावर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह विविध मुद्द्यांवरून संसदेत गदारोळ

नीट पेपरफुटीप्रकरणी आंदोलकांवर झालेल्या पोलीस कारवाईच्या मुद्द्यांवरुन संसदेच आजही गदारोळ झाला. या गदारोळातच लोकसभेत कररचना आणि इतर कायदेसुधारणा विधेयक चर्चेविना मंजूर झालं. त्यानंतर लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं.    राज्यसभेत आज गोंधळातच वाणिज्य, उद्योग, तसंच रसायन आणि खते विभागाशी संबंधित संसदीय स्थायी समितीचे अहवाल सभागृहात मांडण्यात आले. त्यानंतरही गदारोळ सुरूच राहिल्यानं कामकाज सव्वा ३ वाजेपर्यंत तहकूब झालं आहे.   

December 1, 2025 8:38 PM

views 82

संसदेत गदारोळामुळे दोन्ही सदनांचं कामकाज उद्यापर्यंत तहकूब

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. विरोधी पक्ष सदस्यांनी मतदार यादी पुनरीक्षणासह विविध मुद्द्यांवर चर्चा करण्याची मागणी करत केलेल्या घोषणाबाजीमुळं दोन्ही सभागृहांच्या कामकाजात अडथळे आले. तत्पूर्वी दोन्ही सभागृहांनी दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली अर्पण केली आणि विश्वचषक जिंकणारा भारतीय महिला संघ, अंध महिला क्रिकेट संघ, महिला कब्बडी संघ आणि डेफलंपिकमध्ये पदकं मिळवणाऱ्यांचं अभिनंदन केलं.    (लोकसभेत प्रश्नोत्तराचा तास सुरू झाल्यावर विरोधी पक्ष सदस्यांनी मतदार यादी पुनरीक्षणासह विव...

November 8, 2025 5:15 PM

views 1K

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची तारीख जाहीर

संसदेचं हिवाळी अधिवेशन येत्या १ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टद्वारे ही माहिती दिली. १९ डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनात लोकशाही बळकट करणं आणि सामान्य नागरिकांच्या आकांक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीनं सकारात्मक चर्चा व्हावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी पदाची सूत्रं स्वीकारल्यानंतर राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणून त्यांचं हे पहिलंच अधिवेशन असणार आहे. त्यांनी १२ सप्टेंबर रोजी उपराष्ट्रपत...

March 15, 2025 2:31 PM

views 46

प्रसारण सेवा वि-नियमन विधेयक संसदेत लौकर सादर करण्याच्या दृष्टीनं एक कालमर्यादा निश्चित करण्याची संसदीय समितीची शिफारस

प्रसारण सेवा वि-नियमन विधेयक संसदेत सादर करण्यासाठी एक कालमर्यादा निश्चित करण्याची शिफारस संसदीय समितीने सरकारला केली आहे. या विधेयकातल्या काही तरतुदींना विरोध झाल्यामुळे याला गेल्यावर्षी स्थगिती दिली होती.   भाजपा खासदार निशिकांत दुबे यांच्या अध्यक्षतेखालच्या दळणवळण आणि माहिती तंत्रज्ञानविषय़क स्थायी समितीने ही सूचना दिली आहे. या क्षेत्रातील तज्ज्ञांशी सल्लामसलत केल्यानंतर विधेयकाचा अंतिम मसुदा तयार केला जाईल, असं माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं १७ जानेवारी रोजी समितीला कळवलं होतं.

March 10, 2025 1:24 PM

views 61

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं दुसरं सत्र आजपासून सुरू

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं दुसरं सत्र आजपासून सुरू झालं. पीएम श्री योजनेच्या अंमलबजावणीबाबत तमिळनाडू सरकारवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केलेल्या टिप्पणीच्या निषेधात द्रमुक सदस्यांनी गदारोळ केला. केंद्रीय शिक्षण मंडळाच्या शाळांमधे पीएम श्री योजना लागू करण्याला तमिळनाडू सरकारने आधी संमती दिली मात्र आता घूमजाव करुन राज्यसरकार  विद्यार्थ्यांचं नुकसान करीत आहे, अशी टीका प्रधान यांनी केली होती. त्याच्या निषेधात झालेल्या घोषणाबाजीमुळे सभागृहाचं कामकाज अर्धा तास तहकूब करण्यात आ...

February 3, 2025 3:34 PM

views 62

संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दल आभारप्रस्तावावर चर्चा सुरु

उत्तरप्रदेशात प्रयागराज इथं महाकुंभमेळाव्यात झालेल्या चेंगराचेंगरीत अनेक जणांचा मृत्यू झाल्याच्या घटनेवरुन आज संसदेच्या दोन्ही सभागृहांमधे प्रचंड गदारोळ झाला. महाकुंभ व्यवस्थापनात ढिसाळपणा झाल्याचा आरोप करत लोकसभेत विरोधी पक्ष सदस्यांनी घोषणाबाजी केली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अभिभाषणात या दुर्दैवी घटनेचा उल्लेख केला होता. अभिभाषणाबद्दल आभारप्रस्तावावरच्या चर्चेदरम्यान सदस्यांना आपलं म्हणणं मांडता येईल असं सभापती ओम बिरला यांनी सांगितलं. त्यानंतर लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दलच्या ...

February 3, 2025 2:44 PM

views 61

महाकुंभमेळ्यातल्या चेंगराचेंगरीत अनेक जणांचा मृत्यू झाल्याच्या घटनेवरुन आज संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये प्रचंड गदारोळ

उत्तरप्रदेशात प्रयागराज इथं महाकुंभमेळाव्यात झालेल्या चेंगराचेंगरीत अनेक जणांचा मृत्यू झाल्याच्या घटनेवरुन आज संसदेच्या दोन्ही सभागृहांमधे प्रचंड गदारोळ झाला. महाकुंभ व्यवस्थापनात ढिसाळपणा झाल्याचा आरोप करत लोकसभेत विरोधी पक्ष सदस्यांनी घोषणाबाजी केली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अभिभाषणात या दुर्दैवी घटनेचा उल्लेख केला होता. अभिभाषणाबद्दल आभारप्रस्तावावरच्या चर्चेदरम्यान सदस्यांना आपलं म्हणणं मांडता येईल असं सभापती ओम बिरला यांनी सांगितलं. त्यानंतर लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दलच्या ...

January 18, 2025 1:22 PM

views 75

संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या ३१ जानेवारीपासून

संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या ३१ जानेवारीपासून सुरू होत आहे. दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीसमोर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाने अधिवेशनाला प्रारंभ होईल.   केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन एक फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. हा त्यांचा सलग ८वा अर्थसंकल्प असून तो एक विक्रम आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा १३ फेब्रुवारी पर्यंत चालेल, त्यात ९ बैठका होतील.   यादरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दलच्या आभार प्रस्...

December 20, 2024 8:19 PM

views 107

संसद भवनाच्या आवारात आंदोलन

भाजपाचे दोन खासदार काल जखमी झाल्याच्या निषेधार्थ राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या खासदारांनी आज संसद भवनाच्या आवारात आंदोलन केलं. काँग्रेसनं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केल्याचा आरोप या खासदारांनी केला. नागालँडमधल्या खासदार फगनॉन कोन्याक यांच्यांशी कथित गैरवर्तन केल्याप्रकरणी राहुल गांधी यांनी माफी मागावी अशी या खासदारांची मागणी होती.   विरोधी पक्षाच्या सदस्यांनीही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्य्याच्या निषेधार्थ आंदोलन केलं. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरोधात दाखल झाले...