April 13, 2025 6:44 PM

views 30

परळी वैजनाथ रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासासाठी २५ कोटींची मंजुरी

बीड जिल्ह्यातल्या परळी वैजनाथ इथल्या रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासासाठी २५ कोटींच्या निधीला सरकारने मंजुरी दिली आहे. वैजनाथ ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना दळणवळणाची सुविधा यामुळे अधिक सुलभ होणार आहे.