September 10, 2024 8:18 PM

views 113

पॅरीस पॅरालिम्पिकमधल्या भारतीय खेळाडूंचा सत्कार

पॅरीस पॅरालिम्पिकमधल्या भारतीय खेळाडूंचा आज नवी दिल्लीत जवाहरलाल नेहरू स्टेडियम इथं आयोजित समारंभात केंद्रीय क्रीडा आणि युवा कल्याण मंत्री मनसुख मांडवीय यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.  यावेळी विजेत्या खेळाडूंना बक्षीसाचे धनादेश सुपूर्द करण्यात आले. सुवर्ण पदक विजेत्यांना ७५ लाख रुपये, रौप्य पदक विजेत्यांना ५० लाख आणि कांस्य पदक विजेत्या खेळाडूंना ३० लाख रुपये बक्षीस देण्यात आलं.

September 8, 2024 7:17 PM

views 113

पॅरिस पॅरालिंपिक स्पर्धेचा आज समारोप / पदकतालिकेत भारत १८व्या स्थानावर

पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेचा समारोप सोहळा आज रात्री होणार आहे. या कार्यक्रमात भारताचा ध्वज, स्पर्धेतला सुवर्णपदकविजेता तिरंदाज हरविंदर सिंह आणि धावपटू प्रीती पाल यांच्या खांद्यावर असेल. या स्पर्धेत एकंदर २९ पदकांची कमाई करून भारतानं पदकतालिकेत अठरावं स्थान पटकावलं आहे. ७ सुवर्ण, ९ रौप्य आणि १३ कास्यपदकांसह भारतानं स्पर्धेच्या इतिहासातल्या आपल्या सर्वोत्तम कामगिरीची नोंद केली आहे. स्पर्धेतल्या शेवटच्या, महिलांच्या कायाक एकेरी प्रकारात भारताच्या पूजा ओझा हिला चौथ्या स्थानावर समाधान मानावं लागलं. &n...

August 22, 2024 10:47 AM

views 75

भुवनेश्वर विमानतळावर भारतीय हॉकी संघाचं स्वागत

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कास्य पदक जिंकणाऱ्या भारतीय पुरुष हॉकी संघाचं काल भुवनेश्वर विमानतळावर चाहत्यांनी आणि ओडिशा सरकारने भव्य स्वागत केलं. ओडिशाचे क्रीडा मंत्री सूर्यवंशी सूरज, प्रधान सचिव भास्कर ज्योती सरमा आणि इतर सरकारी अधिकारी हॉकी इंडियाचे अध्यक्ष डॉक्टर दिलीप कुमार तिर्की आणि खजिनदार सेकर जे मनोहरन देखील यात सहभागी झाले. दरम्यान, उत्कृष्ट बचावपटू ओडिशाचा अमित रोहिदास, याला मुख्यमंत्री मोहन चरण माझी आणि उपमुख्यमंत्री कनक वर्धन सिंग देव यांच्याकडून चार कोटी रुपयांचा विशेष रोख पुरस्कार मिळाला....

August 21, 2024 1:20 PM

views 75

कोल्हापुरात नेमबाज स्वप्नील कुसळेचं जल्लोषात स्वागत

पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेतला कांस्यपदक विजेता नेमबाज स्वप्नील कुसळे याचं जिल्हा प्रशासनाच्या वतीनं आज कोल्हापुरात जल्लोषात स्वागत करण्यात आलं. महाराणी ताराराणी यांच्या पुतळ्यापासून निघालेल्या स्वागत मिरवणुकीत  नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. शालेय विद्यार्थी, खेळाडू  देखील सहभागी झाले होते.     

August 15, 2024 7:34 PM

views 178

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंची घेतली भेट !

पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज भेट घेतली. यात कास्य पदक विजेता भारतीय हॉकी संघ, नेमबाज मनू भाकर, स्वप्नील कुसळे, सरबज्योत सिंग, कुस्तीपटू अमन सेहरावत यांचा समावेश होता. नीरज चोप्रा उपचारांसाठी जर्मनी इथं गेल्यामुळे तो या भेटीवेळी अनुपस्थित होता.

August 14, 2024 1:23 PM

views 71

कुस्तीपटू विनेश फोगाट अपात्रता प्रकरणाच्या निर्णयाला पुन्हा स्थगिती

महिला कुस्तीपटू विनेश फोगाट अपात्रता प्रकरणाचा निकाल क्रीडा न्याय प्राधिकरणानं पुन्हा पुढे ढकलला आहे. आता हा निकाल १६ ऑगस्ट रोजी जाहीर होण्याची शक्यता असल्याचं भारतीय ऑलिम्पिक संघटनेनं म्हटलं आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ५० किलो वजनी गटात क्युबाची कुस्तीपटू युसनेलिस गुझमान लोपेझ हिच्यासोबत संयुक्त रौप्यपदक आपल्याला देण्यात यावं, अशी मागणी विनेशनं क्रीडा प्राधिकरणाकडे केली होती. सुवर्णपदकाच्या सामन्याच्या दिवशी तिचं वजन १०० ग्रॅम अधिक भरल्यानं तिला स्पर्धेतून अपात्र ठरवण्यात आलं होतं.

August 12, 2024 12:46 PM

views 119

कुस्तीपटू विनेश फोगटच्या अपात्रताप्रकरणी वैद्यकीय पथक जबाबदार नाही – पी. टी. उषा

पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेत महिला कुस्तीगीर विनेश फोगट अंतिम सामन्यासाठी अपात्र ठरल्याप्रकरणी वैद्यकीय पथकाचे प्रमुख डॉ. दिनशॉ पारडीवाला यांना जबाबदार धरता येणार नाही असं भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या अध्यक्ष पी. टी . उषा यांनी म्हटलं आहे. कुस्ती, मुष्टियुद्ध, आणि ज्युदो अशा क्रीडाप्रकारांमधे प्रत्येक खेळाडूच्या वजन, फिटनेस इत्यादीची काळजी त्यांच्या वैयक्तिक प्रशिक्षक पथकाने घ्यायची असते, असं त्यांनी काल प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.  डॉ. पारडीवाला यांची जबाबदारी खेळाडूला दुखापत झाल्यास त्यावर उ...

August 12, 2024 2:45 PM

views 75

पॅरिस ऑलिम्पिकचा शानदार सोहळ्यानं समारोप

पॅरिस ऑलिम्पिक २०२४चा शानदार समारोप समारंभ काल स्टेड दे फ्रान्स मैदानावर पार पडला. भारतीय पुरुष हॉकी संघाचा गोलकीपर पी. आर. श्रीजेश आणि यंदा ऑलिम्पिकमध्ये दोन पदकं पटकावणारी नेमबाज मनू भाकर या सोहळ्यात भारताचे ध्वजधारक होते. एक रौप्य आणि पाच कास्य अशा एकंदर सहा पदकांसह भारत पदकतालिकेत ७१व्या स्थानावर राहिला. २०२०च्या टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारत ४८व्या स्थानी होता. ४० सुवर्णपदकांसह एकंदर १२६ पदकं पटकावलेल्या अमेरिकेनं अव्वल, ९१ पदकांसह चीनने दुसरं, तर ५३ पदकांसह ऑस्ट्रेलियानं तिसरं स्थान मिळवलं. पॅ...

August 11, 2024 9:58 AM

views 81

कुस्तीपटू विनेश फोगटच्या अपात्रतेविरुद्धच्या याचिकेवर १३ ऑगस्टला निर्णय

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये, क्रीडा लवादाने भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगटच्या अपात्रतेविरुद्धच्या याचिकेवरील निर्णय येत्या मंगळवारपर्यंत पुढे ढकलला आहे. एकसदस्यीय लवाद, डॉ. ॲनाबेले बेनेट, यांना निकाल देण्यासाठी मंगळवारी भारतीय वेळेनुसार रात्री साडेनऊ वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. विनेश फोगटने लवादाकडे केलेल्या अर्जात संयुक्त रौप्य पदकाची विनंती केली आहे. 50 किलोग्रॅम प्रकारात उपांत्य फेरीत जिंकल्यानंतर विनेशचं वजन 100 ग्रॅमने जास्त असल्याचं आढळून आलं होतं.

August 9, 2024 10:25 AM

views 80

भारताला कांस्य पदक मिळून दिल्याबद्दल हॉकी इंडियाकडून हॉकी संघाला बक्षीस जाहीर

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघानं कास्य पदक पटकावलं आहे. काल झालेल्या कास्य पदकासाठीच्या लढतीत भारताने स्पेनचा 2-1 असा पराभव केला. या विजयानंतर भारतीय संघावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तसंच विविध केंद्रीय मंत्र्यांनी भारताच्या पुरुष हॉकी संघाचं अभिनंदन केलं आहे.   ऑलिम्पिक मध्ये भारताला कांस्य पदक मिळून दिल्याबद्दल भारताच्या पुरुष हॉकी संघाला हॉकी इंडियाने बक्षीस जाहीर केल आहे. संघातील प्रत्येक खेळाडूला 15 लाख रुपये तर संघाच्या सहकार...