November 8, 2024 7:14 PM

views 29

महाविकास आघाडीनं महायुतीचं मोठं नुकसान केलं – पंकजा मुंडे

लोकसभेच्या निवडणुकांपूर्वी खोटा प्रचार करत  मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करून महाविकास आघाडीनं महायुतीचं मोठं नुकसान केलं असल्याचा आरोप भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी आज हिंगोली जिल्ह्यातल्या सेनगाव इथं केला. महायुतीचे उमेदवार तानाजी मुटकुळे यांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या प्रचारसभेत त्या बोलत होत्या.

July 15, 2024 8:00 PM

views 33

आमदार पंकजा मुंडे आपल्याबाबत खोटी बातमी चालवणाऱ्या खासगी वृत्तवाहिनीवर अब्रू नुकसानीचा करणार दावा

भाजपाच्या राष्ट्रीय सचिव तथा आमदार पंकजा मुंडे यांनी आपल्याबाबत खोटी बातमी चालवणाऱ्या खासगी वृत्तवाहिनीवर अब्रू नुकसानीचा दावा करणार असल्याचं म्हटलं आहे. एका वृत्तवाहिनीने वादग्रस्त प्रशासकीय अधिकारी पूजा खेडकर यांच्या अनुषंगाने पंकजा मुंडे यांच्याबद्दल बातमी प्रसारित केली होती, या बातमीत काहीही तथ्य नसल्याचं सांगत, संबंधित वृत्तवहिनीविरोधात अब्रू नुकसानीचा दावा करणार असल्याचं मुंडे यांनी ट्विट संदेशात म्हटलं आहे.