February 12, 2025 10:06 AM

views 43

Snooker : पंकज अडवाणीने पटकावलं १०व्या राष्ट्रीय स्नूकर स्पर्धेचं विजेतेपद

१०व्या राष्ट्रीय स्नूकर स्पर्धेचं विजेतेपद पंकज अडवाणीने मिळवलं आहे. मध्यप्रदेशात यशवंत क्लबमधे झालेल्या अंतिम सामन्यात त्याने बृजेश दमानीचा ५ विरुद्ध १ अशा गुणफरकाने पराभव केला. पंकज अडवाणीचं राष्ट्रीय पातळीवरचं हे ३६वं विजेतेपद असून त्यामुळे त्याचा अशियाई आणि जागतिक स्नूकर अजिंक्यपद स्पर्धेतला प्रवेश निश्चित झाला आहे. 

November 9, 2024 1:59 PM

views 45

भारताच्या पंकज अडवाणीने केला जागतिक बिलियर्ड्स अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश

भारताच्या पंकज अडवाणीनं कतारमधे दोहा इथं सुरू असलेल्या जागतिक बिलियर्ड्स अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य फेरीत काल त्यानं सौरव कोठारीचा ४-२ असा पराभव केला. सौरवला कांस्यपदक मिळालं. अंतिम फेरीत पंकज अडवाणीचा सामना इंग्लंडच्या रॉबर्ट हॉलशी होणार आहे. हॉलनं सिंगापूरच्या पीटर गिलख्रिस्टचा ४-१ असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.