July 7, 2024 7:54 PM

views 75

आजपासून पंढरपुरातील श्री विठ्ठलाचं दर्शन भाविकांसाठी २४ तास खुले

पंढरपूर इथं आषाढी एकादशी आणि भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता आजपासून श्री विठ्ठलाचं दर्शन २४ तास सुरु राहणार आहे. भाविकांना आता २६ जुलैपर्यंत श्री विठ्ठल रुक्मिणीचं चोवीस तास मुखदर्शन, तर २२ तास १५ मीनिटे पदस्पर्श दर्शन घेता येईल, अशी माहिती, मंदिर प्रशासनाचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली. याशिवाय दर्शन रांगेत शेड, आपत्कालिन गेट, विश्रांती कक्ष, फॅब्रिकेटेड शौचालयं तसंच बसण्याची सुविधा करण्यात आली आहे. 

June 16, 2024 8:05 PM

views 75

पंढरपूर येथे धनगर समाजाची विविध मागण्यासाठी बैठक

पंढरपूर इथं आज सोलापूर जिल्ह्यातल्या धनगर समाजाची बैठक झाली. धनगर समाजातल्या तरुणांना तीस लाख बिनव्याजी कर्ज मिळावं, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर भवनासाठी पंढरपुरात जागा उपलब्ध करून द्यावी, अहिल्यादेवी आर्थिक विकास महामंडळाला येत्या अधिवेशनात निधी वर्ग करावा, आदी मागण्या राज्य सरकारकडे करण्याचा ठराव या बैठकीत करण्यात आला. या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा या बैठकीतून सरकारला देण्यात आला.