December 21, 2025 1:30 PM

views 293

१९ वर्षांखालील क्रिकेट आशिया चषक अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून  प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा भारताचा निर्णय

भारत आणि पाकिस्तानच्या १९ वर्षांखालच्या मुलांच्या संघांमध्ये आज दुबई इथं आशिया चषक क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना सुरु आहे. या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. त्यानंतर पाकिस्ताननं आपल्या डावाला वेगानं सुरुवात केली. भारतानंही चौथ्याच षटकात सलामीवीर हमझा याला बाद करत पाकिस्तानला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र सलामीवीर समीर मीनहास यानं दमदार शतकी खेळी करत, आधी दुसऱ्या गड्यासाठी उस्मान खान याच्यासोबत ९१, तर तिसऱ्या गड्यासाठी अहमद हुसेन याच्यासोबत १३७ धावांची भागिदार...

December 20, 2025 12:58 PM

views 109

पाकिस्तानचे माजी प्रधानमंत्री इम्रान खान आणि त्यांच्या पत्नीला कैदेची शिक्षा

पाकिस्तानातल्या न्यायालयानं तोषखाना घोटाळ्याप्रकरणी पाकिस्तानचे माजी प्रधानमंत्री इम्रान खान आणि त्यांच्या पत्नी बुशरा बीबी यांना १७ वर्षांच्या कैदेची शिक्षा सुनावली आहे. याशिवाय १ कोटी ६४ लाख पाकिस्तानी रुपयांचा दंडही त्यांना ठोठावला आहे. सौदी अरेबियाच्या सरकारकडून २०२१ मध्ये मिळालेल्या भेटवस्तू सरकारी खजिन्यात जमा न करता परस्पर विकल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. दुसऱ्या एका प्रकरणात शिक्षा झाल्यानं दोघेही सध्या कारागृहात आहेत. 

December 12, 2025 2:50 PM

views 60

पाकिस्तानच्या रात्री झालेल्या स्फोटात शाळा पूर्णपणे उद्ध्वस्त

पाकिस्तानच्या उत्तर वझिरिस्तानमधल्या मीर अली इथल्या एका सरकारी शाळेत काल रात्री झालेल्या स्फोटात शाळा पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. अयाज कोट इथल्या शाळेत अज्ञात हल्लेखोरांनी स्फोटके पेरली होती. या स्फोटामुळे शाळेतले सर्व शैक्षणिक उपक्रम ठप्प झाले आहेत.

December 2, 2025 8:19 PM

views 91

पाकिस्तानचे माजी प्रधानमंत्री यांच्या प्रकृतीसंदर्भातली चिंता व्यक्त करत निदर्शनं

पाकिस्तानचे माजी प्रधानमंत्री यांच्या प्रकृतीसंदर्भातली चिंता व्यक्त करत  आज त्यांच्या तेहरीक ई इन्साफ पक्षाच्या कार्यकर्त्यांनी इस्लामाबाद इथल्या उच्च न्यायालयासमोर निदर्शनं केली. तुरुंगातल्या अत्याचारानं इम्रान खान यांचं निधन झाल्याची अफवा पसरल्याच्या पार्श्वभूमीवर आज त्याची बहीण उजमा यांना आज इम्रान खानला तुरुंगात भेटायची परवानगी देण्यात आली.  हे सध्या तुरुंगात असून गेल्या काही दिवसांपासून त्यांचा काहीही संपर्क झालेला नाही. त्यामुळे त्यांच्या समर्थकांनी  रावळपिंडी इथल्या कारागृहाच्या समोर त्य...

November 16, 2025 7:54 PM

views 72

पाकिस्तानात, सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकारांवर गदा आणणाऱ्या घटना दुरुस्ती विरोधात वकिलांचा संप

पाकिस्तानात सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकारांवर गदा आणणाऱ्या २७व्या घटनादुरुस्तीविरोधात वकिलांनी संप पुकारला आहे. न्यायाधीशांनी देखील आपापल्या पदाचे राजीनामे देऊन निषेध नोंदवावा असं आवाहन त्यांनी केलं आहे. आतापर्यंत पाकिस्तानचे सरन्यायाधीश सईद मन्सूर अली शाह यांच्यासह दोन न्यायाधीशांनी राजीनामा दिला आहे. ही घटनादुरुस्ती म्हणजे संविधान आणि न्यायपालिकेवर हल्ला असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या घटनादुरुस्तीने संरक्षण दलांचे प्रमुख हे पदआणि नवीन संवैधानिक न्यायालय स्थापन होणार आहे. पाकिस्तानचे राष्ट्राध...

November 15, 2025 4:08 PM

views 71

तालिबानवरील निर्बंधांवरील सुरक्षा परिषदेच्या समितीचे नेतृत्व करणाऱ्या पाकिस्तानवर भारताची टीका

पाकिस्ताननं संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या तालिबान विरोधातल्या निर्बंधांसाठी गठित करण्यात आलेल्या समितीचं अध्यक्षपद, तसंच दहशतवाद विरोधी पॅनलचं सह अध्यक्षपद भूषवण्यावर भारतानं तीव्र आक्षेप नोंदवला आहे. स्वतःचे हितसंबंध जपणाऱ्या सदस्यांना परिषदेच्या अध्यक्षपदापासून दूर ठेवायला हवं, असं संयुक्त राष्ट्रांमधले भारताचे स्थायी प्रतिनिधी पी. हरीश यांनी म्हटलं आहे. परिषदेच्या कामकाजाच्या पद्धतींवर काल आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्रात ते बोलत होते. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये गेले अनेक दिवस संघर...

November 14, 2025 9:25 AM

views 73

पाकिस्तानमध्ये २७व्या घटना दुरुस्ती विधेयकाला मंजुरी

पाकिस्तानमध्ये २७व्या घटना दुरुस्ती विधेयकाला दोन्ही सभागृहाने मंजुरी दिली. नव्या कायद्यानुसार पाकिस्तानी लष्कर प्रमुख फील्ड मार्शल सय्यद असीम मुनीर यांनी नव्याने सर्वाधिकार प्राप्त झाले आहेत. या घटनात्मक दुरुस्तीमुळे सैन्याच्या सर्व शाखांवर त्यांचे नियंत्रण असेल तसंच न्यायपालिकेतही भविष्यातील कोणत्याही कायदेशीर खटल्यापासून किंवा आव्हानांपासून त्यांचे संरक्षण होणार आहे. पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांनी घटना दुरुस्ती विधेयकाला दोन्ही सभागृहांनी मंजुरी दिल्याची माहिती दिली.

November 12, 2025 6:50 PM

views 67

बलुचिस्तानमध्ये नागरिक बेपत्ता होण्याचं आणि न्यायबाह्य हत्यांच्या प्रमाणात वाढ

बलुचिस्तानमध्ये नागरिक बेपत्ता होण्याचं आणि न्यायबाह्य हत्यांचं प्रमाण वाढलं असून, पाकिस्तानकडून होत असलेल्या साधन संपत्तीच्या वाढत्या शोषणाशी याचा संबंध स्पष्ट होत असल्याचं ‘बलोच ऍडव्होकसी अँड स्टडीज सेंटर’ च्या  अहवालात म्हटलं आहे.  यानुसार, जानेवारी ते जून २०२५ या काळात बलुचिस्तानमध्ये ८२४ नागरिक बेपत्ता झाले, यापैकी  ५३० जणांचा अद्याप शोध लागला नाही.  यात  ४२ टक्क्यापेक्षा जास्त विद्यार्थी असून, त्या खालोखाल कामगार आणि वाहन चालक आहेत.   खाण आणि खनिज कायदा, २०२५ आणि दहशतवाद विरोधी (बलुचिस्तान...

November 1, 2025 3:25 PM

views 84

पाक-व्याप्त काश्मीरमधील दडपशाही थांबवावी, भारताचा पाकिस्तानला कडक इशारा

पाकिस्ताननं पाक-व्याप्त काश्मीरमधली दडपशाही ताबडतोब थांबवावी असा कडक इशारा भारतानं दिला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत, भारताच्या संयुक्त राष्ट्र मिशनच्या प्रथम सचिव भाविका मंगलनंदन बोलत होत्या. पाकिस्तानी लष्करानं गेल्या काही आठवड्यांमध्ये आपल्या ताब्यातल्या काश्मीरच्या काही भागात मूलभूत हक्कांसाठी आणि स्वातंत्र्यांसाठी आंदोलन करणाऱ्या अनेक निष्पाप नागरिकांना ठार केल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.   पाकिस्ताननं बेकायदेशीरपणे बळकावलेल्या भारताच्या भूभागातलं मानवी हक्काचं उल्लंघन थांबवावं...

October 20, 2025 12:48 PM

views 116

दोन विद्यार्थ्यांसह किमान १८ बलोचिस्तानी नागरिक पाकिस्तानच्या ताब्यात

बलुचिस्तानच्या विविध जिल्ह्यांमध्ये शुक्रवारी रात्री केलेल्या कारवाईदरम्यान पाकिस्ताननं दोन विद्यार्थ्यांसह किमान १८ बलोचिस्तानी नागरिकांना ताब्यात घेऊन अज्ञात ठिकाणी नेल्याची माहिती आहे. कालही पाकिस्तानच्या सशस्त्र दलांनी बलुचिस्तानच्या विविध भागांतून आठ नागरिकांना ताब्यात घेतलं. अशा प्रकारे नागरिकांना गायब करणं हे कायदेशीर आणि नैतिक मूल्यांचं स्पष्ट उल्लंघन आहे, अशी टीका पाकिस्तान मानवाधिकार आयोग आणि इतर संघटनांनी केली आहे. बलुचिस्तानात अशा घटना घडत राहिल्या, तर तिथली परिस्थिती अस्थिर होईल, अस...