April 23, 2025 10:39 AM

views 73

पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात अनेक पर्यटकांचा मृत्यू

जम्मू काश्मीरमधल्या पहलगाम जिल्ह्यात काल दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये नौदलाच्या अधिकाऱ्यासह २ परदेशी पर्यटकांचा समावेश आहे. या हल्ल्यात २० पर्यटक जखमी झाल्याचं वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे. अद्याप ओळख पटवण्याचं आणि बचावकार्य सुरू असल्यामुळे मृतांचा आणि जखमींचा नेमका आकडा स्पष्ट नसल्याचं सुरक्षा दलाच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं. लष्कर ए तैयबा या दहशतवादी संघटनेच्या द रेझिस्टन्स फ्रंट या गटानं या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे.   दरम्यान, या भ्याड ह...

April 23, 2025 10:39 AM

views 62

प्रधानमंत्री मायदेशी परतले, विमानताळवरच केली संबंधितांशी चर्चा

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सौदी अरेबियाचा दौरा सोडून भारतात परतले आहेत. भारतात आल्यानंतर त्यांनी विमानतळावरच परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासह वरीष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करुन परिस्थितीचा आढावा घेतला.   प्रधानमंत्र्यांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. या हल्ल्याच्या सूत्रधारांवर कठोर कारवाई केली जाईल. दहशतवाद्यांचे दुष्ट मनसुबे कधीच सफल होणार नाहीत, असं...

April 23, 2025 10:42 AM

views 45

J & K : केंद्रिय गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उच्च स्तरीय बैठक

जम्मू आणि काश्मीरमधल्या पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांनी श्रीनगर इथं सुरक्षा दलांच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांसमवेत उच्च स्तरीय बैठक घेतली. आज ते नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांच्यासह घटनास्थळी भेट देणार आहेत. तसंच जखमींची विचारपूस करुन ते घटनेच्या साक्षीदारांशी संवाद साधतील.