August 8, 2024 3:48 PM

views 35

बांगलादेशात अडकलेल्या राज्यातल्या विद्यार्थी, अभियंत्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्र्यांची परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चा

बांगलादेशात अडकलेले राज्यातले विद्यार्थी आणि अभियंत्यांना मदत करण्यासाठी आणि त्यांना मायदेशी परत आणण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा केली. या विद्यार्थ्यांना सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन जयशंकर यांनी यावेळी दिलं. या विद्यार्थ्यांना परत आणण्याच्या कार्यवाहीसाठी परराष्ट्र मंत्रालयात सहसचिव दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.