May 13, 2025 7:45 PM

views 41

ऑपरेशन सिंदूरच्या यशस्वी मोहिमेची ७० देशांच्या परराष्ट्र सेवा खात्यांना दिली माहिती

संरक्षण गुप्तचर संस्थेचे महासंचालक लेफ्टनंट जनरल डी एस राणा यांनी ऑपरेशन सिंदूरच्या यशस्वी मोहिमेची  माहिती ७० देशांच्या परराष्ट्र सेवा खात्यांना दिली. भारताचा दृढनिश्चय आणि सामर्थ्याचा त्यांनी यावेळी विशेष उल्लेख केला. दहशतवादी तळांना लक्ष्य करण्यासाठी भारताने केलेल्या तयारीची सर्व प्रक्रिया त्यांनी सांगितली. तसंच भारतीय संरक्षण दलांच्या एकत्रितपणे केलेल्या अचूक माऱ्याबद्दलही सांगितलं. पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या अपप्रचाराबद्दलही राणा यांनी या देशांना माहिती दिली.

May 11, 2025 8:46 PM

views 63

विशेष अधिवेशन बोलावण्याची विरोधकांची मागणी

पहलगाम दहशतवादी हल्ला, ऑपरेशन सिंदूर आणि त्यानंतरचा युद्धविराम या मुद्द्यांवर संसदेचं विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी विरोधकांनी केली आहे.   काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यसभेतले विरोधी पक्ष नेते मल्लिकार्जुन  खरगे यांनी तसं पत्र प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना लिहीलं आहे. या मुद्यांवर व्यापक चर्चा होणं आवश्यक असल्याचं मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी व्यक्त केलं आहे. भारत पाकिस्तान दरम्यान शस्त्रसंधीची घोषणा सर्वप्रथम अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी समाजमाध्यमांवर केली...