December 3, 2025 9:19 AM

views 91

श्रीलंकेला भारताकडून ‘ऑपरेशन सागर बंधु’ अंतर्गत मदत

दितवा चक्रीवादळामुळे श्रीलंकेत उद्भवलेल्या आपत्तीला, भारत सरकार 'ऑपरेशन सागर बंधु' अंतर्गत मदत पुरवत आहे. भारतीय वायुदलाच्या हेलिकॉप्टरने श्रीलंकेतील विविध ठिकाणांहून, पुराच्या पाण्यात अडकलेल्या सुमारे 47 जणांची काल सुटका केली. दरम्यान भारतीय हवाई दलाचं सी 17 हे वाहतूक विमान काल कोलंबो इथं उतरलं असून या विमानात एक सर्व सोईंनीयुक्त इस्पितळ, 70 पेक्षा अधिक वैद्यकीय आणि सहाय्यक कर्मचारी आणि आवश्यक असलेली वाहनं आहेत असं परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी म्हटलं आहे. श्रीलंकेतील पूरग्रस्तांना भारत सर्व...

December 1, 2025 8:24 PM

views 56

भारतानं ऑपरेशन सागर बंधू अंतर्गत श्रीलंकेला ५३ टन मदत साहित्य पोहोचवलं

ऑपरेशन सागर बंधू अंतर्गत दितवा चक्रीवादळाचा फटका बसलेल्या श्रीलंकेला भारतानं ५३ टन मदत साहित्य पोहोचवलं आहे. भारतीय नौदलाच्या दोन नौकांमधून साडेनऊ टन धान्य श्रीलंकेत पोहोचवण्यात आलं आहे. याशिवाय, तंबू, पांघरुणं, तयार अन्नपदार्थ, औषधं, वैद्यकीय साहित्य यासह आणखी साडे एकतीस टन मदत साहित्य, भारतीय हवाई दलाच्या तीन विमानांद्वारे पाठवण्यात येणार आहे. तसंच एनडीआरएफ, यूएसएआरच्या पथकांसह चातक हेलिकॉप्टर्सद्वारे व्यापक मदत आणि बचावकार्य सुरू आहे. आत्तापर्यंत दीडशेपेक्षा जास्त नागरिकांना सुरक्षित बाहेर का...

November 29, 2025 2:27 PM

views 159

श्रीलंकेच्या मदतीसाठी भारताची ऑपरेशन सागर बंधू मोहीम

वादळग्रस्त श्रीलंकेच्या मदतीसाठी भारतानं ऑपरेशन सागर बंधू ही मोहीम हाती घेतली आहे. या मोहीमेअंतर्गत वैद्यकीय मदतीचा ८० टन साठा घेऊन एक विशेष विमान श्रीलंकेला पोहोचलं, तर आणखी एक विमान लवकरच पोहचेल. त्याआधी आयएनएस विक्रांत आणि आयएनएस उदयगिरी या भारतीय युद्धनौकांनी श्रीलंकेला मदत साहित्य पोहचवलं. भारतानं राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या ८० कर्मचाऱ्यांचा समावेश असलेली दोन शोध आणि बचाव पथकं श्रीलंकेला पाठवली असल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी दिली आहे.   प्रधानमंत्री...