April 13, 2025 8:06 PM

views 67

नाशिकमध्ये कांद्याच्या दरात घसरण

नाशिक जिल्ह्यात लासलगावसह सर्व बाजार समित्यांत कांद्याच्या दरात मोठी घसरण होत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. केंद्र सरकारने कांद्यावरचं २० टक्के निर्यातशुल्क हटवल्यानंतरही भाव चांगला मिळत नसल्यानं केंद्र सरकारने कांद्याला अनुदान जाहीर करावे, अशी मागणी कांदा उत्पादक शेतकरी संघटनांनी केली आहे.   लासलगाव बाजार समितीमध्ये काल उन्हाळ कांद्याला कमीत कमी ५०० रुपये, जास्तीत जास्त १३०१ रुपये तर सरासरी ११२५ रुपये क्विंटल भाव मिळाला तर लाल कांद्याला कमीत कमी ...

September 14, 2024 8:35 PM

views 76

नाशिकच्या बाजारात कांद्याचे दर वधारले

कांद्याच्या निर्यातीवर किमान दर मर्यादा हटवल्यानं तसंच निर्यात शुल्क निम्म्यानं कमी केल्यानंतर नाशिक जिल्ह्यातल्या घाऊक बाजारात कांद्याचे  दर क्विंटल मागे ४०० ते ५०० रुपयांनी वधारले आहेत. लासलगाव बाजारात आज चांगल्या प्रतीच्या कांद्याला सरासरी ४ हजार ६०० रुपये दर मिळाला. लोकसभा निवडणुकीवेळी केंद्र सरकारनं कांद्यावरची निर्यात बंदी उठवली होती. मात्र, प्रति मेट्रीक टन ५५० डॉलर किमान निर्यात मूल्य आणि ४० टक्के निर्यात शुल्क  कायम ठेवल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजी होती. आता  केंद्र सरकारनं किमान निर्यात...