September 15, 2024 2:43 PM

views 55

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ओणम निमित्त दिल्या शुभेच्छा

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ओणमनिमित्त सर्व देशबांधवांना शुभेच्छा दिल्या आहेत. ओणम चा सण सर्वांच्या जीवनात शांती, समृद्धी आणि उत्साह घेऊन येवो अशी कामना प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमवरच्या आपल्या संदेशात केली आहे. ओणम हा केरळच्या  गौरवशाली संस्कृतीचा सण असून मल्याळी बांधव जगभरात हा सण मोठया उत्साहानं साजरा करत असल्याचंही प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे.

September 14, 2024 7:49 PM

views 56

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या ओणमनिमित्त शुभेच्छा

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ओणमनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. केरळमधला हा सुगीचा सण समृद्ध परंपरेचं आणि सांस्कृतिक वारशाचा निदर्शक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. आपल्या संदेशात अन्नदाता शेतकऱ्यांप्रति त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.