January 3, 2025 2:23 PM

views 31

ओदिशाचे राज्यपाल म्हणून डॉ. हरी बाबू कंभमपाटी यांनी घेतली शपथ

ओदिशाचे राज्यपाल म्हणून डॉ. हरी बाबू कंभमपाटी यांनी आज शपथ घेतली. ओदिशा उच्च न्यायलयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती चारधारी शरण सिंग यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. कंभमपाटी यापूर्वी मिझोरमचे राज्यपाल होते.

October 15, 2024 1:48 PM

views 30

जम्मू-काश्मिरमधल्या नव्या सरकारचा उद्या शपथविधी

जम्मू-काश्मिरमधल्या नव्या सरकारचा शपथविधी उद्या सकाळी श्रीनगरमध्ये होणार आहे. नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी काल नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांना नवीन सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित केलं. इथली राष्ट्रपती राजवट केंद्र सरकारनं परवाच उठवली होती.