November 9, 2025 2:08 PM

views 85

टेनिसपटू नोव्हाक जोकोविचनं एटीपी अंतिम फेरीतून घेतली माघार

सर्बियाचा टेनिसपटू नोव्हाक जोकोविच यानं एटीपी २५० अथेन्स गटाचं विजेतेपद पटकावल्यानंतर तासाभरातच खांद्याच्या दुखापतीमुळे एटीपी अंतिम फेरीतून माघार घेतली आहे. हंगामातली ही शेवटची फेरी असून ती चुकण्याचं त्याचं हे सलग दुसरं वर्ष आहे. जोकोविचनं अथेन्स स्पर्धेत लॉरेन्झो मुसेटी याच्यावर ४-६, ६-३, ७-५ अशी मात करून आपल्या कारकीर्दीतलं १०१ वं, तर हार्डकोर्टवरचं ७२ वं विजेतेपद पटकावलं आणि हार्डकोर्टवर सर्वाधिक विजेतेपदांचा रॉजर फेडरर याचा विक्रम मोडीत काढला. आता जोकोविचनं एटीपीतून माघार घेतल्यामुळं त्याच्य...

August 5, 2025 1:26 PM

views 44

टेनिसपटू नोवाक जोकोविचची सिनसिनाटी टेनिस स्पर्धेतून माघार

प्रसिद्ध टेनिसपटू नोवाक जोकोविच याने सिनसिनाटी टेनिस स्पर्धेतून माघार घेतली आहे. गेल्या महिन्यात झालेल्या विम्बल्डन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत वैद्यकीय कारणांमुळे माघार घेतल्यानंतर जोकोविच प्रथमच हार्ड कोर्ट प्रकाराच्या या स्पर्धेत सहभागी होणार होता. मात्र आता तो थेट येत्या २४ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत खेळणार आहे.

May 25, 2025 7:59 PM

views 60

नोवाक जोकोविचनं जिनेव्हा ओपन जिंकून १०० वे एटीपी जेतेपद पटकावले

जिनेव्हा खुल्या टेनिस स्पर्धेत नोवाक जोकोविचने काल पोलंडच्या ह्युबर्ट हुर्काझला हरवून पुरुष एकेरीचं विजेतेपद पटकावलं. त्याच्या कारकिर्दीतलं  जोकोविच चं हे १०० वं एटीपी एकेरी विजेतेपद आहे. जोकोविचनं हुर्काझचा ५-७, ७-६, ७-६ असा पराभव केला. टेनिसपटू जिमी कॉनर्स आणि रॉजर फेडररनंतर ही कामगिरी करणारा जोकोविच हा तिसरा खेळाडू ठरला आहे. 

August 31, 2024 1:22 PM

views 52

अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत ॲलेक्सेई पॉपिरिन कडून नोव्हाक जोकोविचचा पराभव

अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत गतविजेता नोव्हाक जोकोविचला ऑस्ट्रेलियाच्या ॲलेक्सेई पॉपिरिन यानं पराभवाचा धक्का दिला. पॉपिरिननं जोकोविचवर ६-४, ६-४, २-६, ६-४ अशी मात केली. एका वर्षात एकही ग्रँडस्लॅम जिंकण्यात अपयशी ठरण्याची जोकोविचची २०१७नंतरची ही पहिलीच वेळ आहे.  दरम्यान, भारताचा युकी भांब्री आणि त्याचा फ्रेंच जोडीदार अल्बानो ऑलिवेट्टी यांनी पुरुष दुहेरीत तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. तत्पूर्वी, रोहन बोपण्णा आणि मॅथ्यू एब्देन या जोडीनं उपउपांत्यपूर्व फेरी गाठली. एन. श्रीराम बालाजी आणि त्याच्या अर्जें...

August 29, 2024 1:30 PM

views 60

अमेरिकन खुल्या ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत नोव्हाक जोकोविचचा तिसऱ्या फेरीत प्रवेश

अमेरिकन खुल्या ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत नोव्हाक जोकोविचने तिसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. आर्थर ॲशे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात त्यानं त्याच्याच देशाचा म्हणजेच सर्बियाच्या लास्लो जेरेचाचा ६-४, ६-४, २-० ने पराभव केला. जोकोविचचा पुढील सामना ऑस्ट्रेलियाच्या ॲलेक्सी पोपिरनशी होणार असून जोकोविचनं गेल्या वर्षभरात पोपरिनला तीन विविध स्पर्धांमध्ये पराभूत केलं आहे.

August 6, 2024 5:59 PM

views 53

नोव्हाक ज्योकोविचः ‘गोट’ ते ‘करिअर गोल्डन स्लॅम’

विख्यात टेनिसपटू, २४ वेळा ग्रँडस्लॅम पदकविजेता नोव्हाक ज्योकोविच यानं यंदाच्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये टेनिस एकेरीचं सुवर्णपदक पटकावलं. या विजयासोबतच करिअर गोल्डन स्लॅम, अर्थात आपल्या कारकीर्दीत चारही ग्रँडस्लॅम स्पर्धा आणि शिवाय ऑलिम्पिकचं सुवर्णपदक पटकावणाऱ्या काही मोजक्या टेनिसपटूंच्या यादीत नोव्हाक ज्योकोविचच्या नावाची भर पडली. या उमद्या खेळाडूविषयी.. १४ जुलै २०२४. विम्बल्डनच्या अतिशय प्रतिष्ठित सेंटर कोर्टवर एकदोनदा नव्हे, तर दहा वेळा अजिंक्यपदासाठी लढत दिलेला आणि सात वेळा विम्बल्डनची देखणी ट्र...