May 13, 2025 7:29 PM

views 72

मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समधे १ हजार २८२ अंकाची घसरण

मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज १ हजार २८२  अंकाची म्हणजेच  सुमारे दीड  टक्क्यांची  घसरण  नोंदवत ८१ हजार १४८ अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी देखील  ३४६ अंकांनी घसरून २४ हजार ५७८ अंकावर बंद झाला. मात्र मुंबई शेअर बाजारात एकंदर सकारात्मक चित्र दिसून आलं. आज २ हजार ५५९ कंपन्यांचे शेअर्स वधारले. १ हजार ४०२ कंपन्यांचे शेअर्स घसरले आणि १४० कंपन्यांचे शेअर्स कायम राहिले. राष्ट्रीय शेअर बाजारात ४३ कंपन्यांनी ५२ आठवड्यांचा उच्चांक , तर १० कंपन्यांनी ५२ आठवड्यांचा नीचांक गाठला.

April 7, 2025 6:52 PM

views 55

अमेरिकेनं वाढवलेल्या करांमुळं जगभरातल्या शेअर बाजारात हाहाकार

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी विविध देशांवर लादलेल्या करांमुळे जगभरातल्या शेअर बाजारांसह भारतीय बाजारातही आज हाहाकार माजला. गेल्यावर्षी लोकसभा निवडणुकीचे निकाल लागले त्यादिवसानंतरची सर्वात मोठी घसरण आज देशातल्या शेअर बाजारांनी नोंदवली. यामुळे देशातल्या गुंतवणूकदारांचं साडे १३ लाख कोटी रुपयांचं नुकसान झालं.    दिवसअखेर सेन्सेक्स २ हजार २२७ अंकांनी घसरुन ७३ हजार १३८ अंकांवर बंद झाला. निफ्टी ७४३ अंकांची घट नोंदवून २२ हजार १६२ अंकांवर स्थिरावला. सत्रादरम्यान सेन्सेक्स सुमारे ४ ह...

October 28, 2024 7:08 PM

views 81

शेअर बाजार पुन्हा तेजीत, सेन्सेक्समधे ६०३, तर निफ्टीत १५८ अंकांची वाढ

पाच दिवसांच्या मंदीनंतर आज देशातला शेअर बाजार तेजीत बंद झाला. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज ६०३ अंकांची वाढ झाली आणि तो ८० हजार ५ अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १५८ अंकांची वाढ होऊन तो २४ हजार ३३९ अंकांवर बंद झाला. बँक, वस्तू, दूरसंवाद, आरोग्य क्षेत्रातल्या कंपन्यांना या तेजीचा फायदा झाला.

August 6, 2024 7:15 PM

views 45

शेअर बाजारात घसरण सुरुच

जपानच्या निक्केई या शेअर बाजारात झालेल्या घसरणीचा थेट परिणाम काल भारतीय शेअर बाजारावर झाला होता. आजही संपूर्ण दिवसभरात शेअर बाजारात घसरण सुरू राहिली.  मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समधे आज १६६ अंकांची घसरण झाली आणि तो ७८ हजार ५९३ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही ६३ अंकांची घसरण नोंदवत २३ हजार ९९३ अंकांवर बंद झाला.