January 1, 2026 3:36 PM

views 75

राज्यभरात नववर्षाचं उत्साहात स्वागत

नववर्षाचं स्वागत देशभरासह राज्यात आनंदात आणि उत्साहात झालं.  राजधानी दिल्लीसह देशाच्या इतर भागातही नववर्षाचं स्वागत करण्यासाठी नागरिक एकत्र आले  होते.     मुंबईत गेटवे ऑफ इंडिया, मरीन ड्राइव्ह,  गिरगाव, दादर, जुहू चौपाटी, आणि इतर सार्वजनिक ठिकाणी नागरिकांनी एकत्र येऊन मोठ्या जल्लोषात नववर्षाचं स्वागत केलं. नव्या वर्षाच्या पहाटे आज मुंबईत पावसानं हजेरी  लावली. त्यामुळे वातावरणात गारवा पसरला. राज्यातल्या विविध भागातही नागरिकांनी नववर्षाचं स्वागत केलं. नंदुरबारमधे श्रॉफ हायस्कूलच्या विद्यार्थ्...

January 1, 2025 6:58 PM

views 82

राज्यात विविध उपक्रमांनी नववर्षाचं स्वागत

राज्यात विविध उपक्रमांनी नववर्षाचं स्वागत झालं. विविध देवस्थानांवर नागरिकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. शिवसेनेच्या वतीनं ठाण्यात आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहभाग घेत रक्तदान केलं. धुळे जिल्ह्यातही युवक बिरादरी आणि रक्ताशय संस्थेनं गेल्या ४१ वर्षांच्या परंपरेनुसार नववर्षाचं स्वागत करण्यासाठी रक्तदान शिबीर आयोजित केलं होतं. नंदुरबार शहरातल्या श्रॉफ हायस्कुलमधल्या विद्यार्थ्यांनी सामूहिक सूर्य नमस्कार घालून आरोग्य संपन्नतेचा संदेश दिला. सांगलीत काल रात्री लोक...

January 1, 2025 3:54 PM

views 68

जगभरात नवीन वर्षाचं जल्लोषात स्वागत

देशासह जगभरात नवीन वर्षाचं जल्लोषात स्वागत केलं जात असून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. भारताच्या दैदिप्यमान, सर्वसमावेशक आणि शाश्वत भविष्यासाठी एकजुटीनं कार्य करण्याच्या वचनबद्धतेला आपण पुन्हा एकदा उजाळा देऊ या, असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. संविधानकर्त्यांच्या स्वप्नांना साकार करत २०४७ पर्यंत विकसित भारताचं स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी कार्य करण्याची हीच वेळ असल्याची आठवण उपराष्ट...

December 31, 2024 8:11 PM

views 57

नववर्षाच्या स्वागतासाठी सर्वत्र उत्साहाचं वातावरण

२०२४ हे वर्ष संपायला आता अवघे काही तास शिल्लक आहेत. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी राज्यभरात जय्यत तयारी करण्यात आली आहे.   नवीन वर्षाच्या स्वागतासाठी राज्यातले नागरिक सज्ज झाले आहेत. नाताळ आणि त्याला लागून आलेल्या सुट्ट्यांच्या निमित्ताने पर्यटक विविध पर्यटन स्थळांवर दाखल झालेत. नववर्षानिमित्त ठिकठिकाणी पार्ट्यांचं आयोजन करण्यात आलं आहे. हॉटेल, समुद्र किनारे, चौपाट्या, पब, डिस्कोथेक अशा विविध ठिकाणांवर नवीन वर्षाचं स्वागत केलं जाणार आहे. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबईत  १५ ह...

December 31, 2024 7:17 PM

views 86

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी सिंधुदुर्गात पर्यटक दाखल

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाच्या स्वागतासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल झालेत. त्यामुळे समुद्रकिनारे  आणि पर्यटन स्थळ पर्यटकांनी गजबजून गेली आहेत.  गतवर्षीच्या तुलनेत यंदाचा पर्यटन हंगाम तेजीत आहे. त्यामुळे लाखोंची उलाढाल होत आहे. जिल्ह्यातल्या शिरोडा, वेंगुर्ले, देवगड, मालवण या महत्त्वाच्या समुद्रकिनारी पर्यटकांची गर्दी आहे. नाताळ सुट्टी आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी देशभरातून येणाऱ्या पर्यटकांच्या स्वागतासाठी पर्यटन व्यावसायिकांनी जय्यत तयारी केली होत...

December 31, 2024 2:53 PM

views 50

नववर्ष स्वागताचा सर्वत्र उत्साह, प्रशासनही सज्ज

आज 31 डिसेंबर- सरत्या वर्षाला निरोप देऊन नव्या वर्षाचं स्वागत करण्याचा दिवस. नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी सर्वत्र उत्साह आणि जल्लोष दिसत आहे. देशभरात विविध पर्यटन स्थळं गर्दीने फुलून गेली आहेत. ठिकठिकाणी स्थानिक प्रशासनानंही यासाठी जय्यत तयारी केली आहे. जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, लडाख इथं हिमवृष्टीचा आनंद घेत नववर्षाचं स्वागत करता यावं याकरता आतिथ्य उद्योगाने वेगवेगळे उपक्रम राबवले आहेत. हॉटेल आणि उपाहार गृहं, मुंबईतल्या समुद्र किनाऱ्यांवर रात्रीच्या वेळी येणाऱ्या प्रवाशांच्या स...