July 22, 2024 1:30 PM

views 44

नीट युजी परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटण्याचा प्रकार केवळ पाटणा इथं झाल्याचं केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचं प्रतिपादन

नीट युजी परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटण्याचा प्रकार केवळ पाटणा इथं झाल्याचं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज लोकसभेत सांगितलं. नीट परीक्षेतल्या घोटाळ्याची चौकशी सीबीआय मार्फत चालू असून याप्रकरणी न्यायलयात सुनावणी सुरु आहे. असं ते म्हणाले. देशभरात ४हजार ७०० केंद्रांवर नीट युजी परीक्षा घेण्यात आली. त्यातल्या एका केंद्रावरच अनियमतता झाल्याची नोंद आहे, असं एका पुरवणी प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी सांगितलं. लोकसभेतले विरोधी पक्ष नेता राहुल गांधी यांनी देशात स्पर्धापरीक्षा यंत्रणेबद्दलचा म...