August 27, 2025 8:25 PM

views 62

गडचिरोली जिल्ह्यात पोलिसांशी झालेल्या चकमकीत चार नक्षलवादी ठार

गडचिरोली जिल्ह्यात भामरागड इथं कोपर्शी गावाजवळ आज पोलिसांशी झालेल्या चकमकीत चार नक्षलवादी ठार झाले. यात तीन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. नक्षलवादी काही घातपात करायच्या तयारीत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती, त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी या भागात मोहीम सुरू केली होती.   आज नक्षलवाद्यांनी केलेल्या गोळीबाराच्या प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी केलेल्या गोळीबारात चौघेजण ठार झाले. आठ तास ही चकमक चालली. पोलिसांनी घटनास्थळावरून काही शस्त्रं जप्त केली आहेत. मृत नक्षलवाद्यांची ओळख पटव...

April 15, 2025 8:50 AM

views 63

शरण आलेल्या नक्षल्यांसाठी गडचिरोलीमध्ये ‘प्रोजेक्ट संजीवनी’ची सुरुवात

गडचिरोली पोलिसांनी राबविलेल्या विविध लोकोपयोगी उपक्रमांमुळे प्रभावीत होऊन शरण आलेल्या नक्षल्यांसाठी पोलिसांनी 'प्रोजेक्ट संजीवनी' हा नवा उपक्रम सुरु केला आहे. या उपक्रमांतर्गत शरण आलेल्या नक्षल्यांना हक्काचं निवासस्थान मिळावं यासाठी चार रो-हाऊसेस तयार करण्यात येणार आहेत; त्याचं भूमिपूजन पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या हस्ते काल झालं. राज्य शासनाने २००५ पासून नक्षल्यांसाठी आत्मसमर्पण योजना सुरु केली. ही योजना आणि गडचिरोली पोलिसांनी राबविलेले लोकोपयोगी उपक्रम बघून आतापर्यंत ७०४ नक्षल्यांनी पोलिसांप...

March 14, 2025 10:14 AM

views 69

छत्तीसगडमध्ये १७ नक्षलवादी शरण

छत्तीसगडच्या विजापूर जिल्ह्यात काल सतरा नक्षलवादयांनी शरणागती पत्करली. त्यापैकी नऊ जणांवर २४ लाख रुपयांचे रोख बक्षीस होतं. पोकळ आदर्शवाद, वरिष्ठ नक्षलवाकडून होत असलेलं निष्पाप आदिवासींचं शोषण आणि सुरक्षा दलांच्या वाढत्या प्रभावामुळे हे नक्षलवादी शरण आले असल्याचं वरिष्ठ पोलिस अधीक्षक जितेंद्र कुमार यादव यांनी सांगितलं.

March 5, 2025 8:00 PM

views 53

गडचिरोली पोलीस आणि CRPF नं आज दोन नक्षलवाद्यांना अटक

गडचिरोली पोलिस आणि CRPF नं आज दोन नक्षलवाद्यांना अटक केली. केलू पांडू मडकाम आणि रमा दोहे कोरचा अशी त्यांची नावं आहेत. त्यांच्यावर ८ लाख रुपयांचं बक्षीस होतं. एका पोलिस शिपाई तसंच भामरागड पंचायत समितीचे माजी सभापती सुखराम मडावी यांच्या हत्येत त्यांचा सहभाग होता.