September 22, 2025 2:30 PM

views 65

शारदीय नवरात्रोत्सवाला आजपासून प्रारंभ

देशात शारदीय नवरात्रोत्सवाला आजपासून सुरुवात झाली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सर्व देशवासीयांना आरोग्य आणि सौभाग्यासाठी दुर्गामातेचे आशिर्वाद लाभो, अशी कामना त्यांनी केली. आजपासून जीएसटी बचत उत्सव सुरू होत असल्यामुळे यावर्षीचा नवरात्रोत्सव विशेष असल्याचं प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे.    राज्यातल्या साडेतीन शक्तीपीठ ठिकाणीही घटस्थापना करण्यात आली. तुळजापूरचं तुळजाभवानी मंदिर, कोल्हापूरचं महालक्ष्मी मंदिर, नांदेड जिल्हातल्या माहुरचं रे...

October 3, 2024 2:56 PM

views 72

देशभरात आजपासून शारदीय नवरात्रौत्सवाला प्रारंभ

राज्यात आजपासून सर्वत्र शारदीय नवरात्रौत्सवाला उत्साहाने प्रारंभ झाला. आजपासून पुढचे नऊ दिवस देवीच्या नऊ रुपांचं पूजन केलं जाईल. तुळजापूरची तुळजाभवानी, कोल्हापूरची अंबाबाई, वणीची सप्तशृंगी आणि माहूरची रेणुका या साडेतीन शक्तीपीठांच्या मंदिरांमध्येही नवरात्रोत्सवाला घटस्थापनेने प्रारंभ झाला. याशिवाय राज्यात इतरत्रही देवी मंदिरांमधे उत्सव सुरु झाला. मुंबईतही मुंबादेवी आणि महालक्ष्मी यांच्या मंदिरांमध्ये या उत्सवाला सुरुवात झाली आहे. घरोघरी घटस्थापना करुन भाविक देवीचं पूजन करीत आहेत.   रत्नागिर...