October 11, 2024 3:04 PM

views 53

नवी मुंबई विमानतळावर ४ टर्मिनलची उभारणी होणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नवी मुंबई विमानतळावर ४ टर्मिनलची उभारणी होणार असून या विमानतळावरून वर्षाला ९ कोटी लोक प्रवास करतील, तसंच २६ लाख टन कार्गो वाहतूक होईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या हवाई पट्टीवर भारतीय हवाई दलाच्या C-295 विमानाचं यशस्वी चाचणी लँडिंग झाल्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते.   भारतीय विमानतळ प्राधिकरणाने विमानतळावरील इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टीमच्या चाचण्या पूर्ण केल्यानंतर आज धावपट्टीची चाचणी करण्यात आली. यावेळी केंद्रीय वि...

September 13, 2024 2:54 PM

views 73

राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य डॉ.पी.पी.वावा यांची नवी मुंबई पालिकेला भेट

केंद्र सरकारच्या राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य डॉ.पी.पी.वावा यांनी आज नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांना एका सादरीकरणाद्वारे महानगरपालिकेच्या स्वच्छताविषयक कार्याची आणि सफाई कर्मचाऱ्यांसाठीच्या सोयीसुविधांची माहिती पालिका आयुक्तांनी दिली. डॉ.वावा यांनी महानगरपालिकेच्या स्वच्छताविषयक विविध वाहनांची आणि यंत्रसामुग्रीची प्रत्यक्ष पाहणी केली तसंच सफाईमित्रांशी संवाद साधला. इतर शहरांच्या तुलनेत नवी मुंबई महानगरपालिकेचं  काम पुढारलेलं असून स्वच्छता कामगारांच्या सुरक्षे...

July 27, 2024 7:23 PM

views 57

नवी मुंबईत बेलापूरमध्ये इमारत कोसळून तिघांचा मृत्यू

राज्यात नवी मुंबईच्या बेलापूरमधल्या सेक्टर १९ मधल्या शाहबाज गावातली एक तीन मजली इमारत आज पहाटे कोसळून तिघांचा मृत्यू झाला आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या दोघांना अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढलं असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मदत आणि बचावकार्य पूर्ण झालं असून ५२ जणांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेबद्दल नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलाश शिंदे यांच्याशी चर्चा केली आणि दुर्घटनाग्रस्त लोकांना तातडीनं आवश्यक मदत देण्याची सूचना केल्या होत्या. या घट...

June 24, 2024 7:20 PM

views 77

माथाडी कामगारांचा नवी मुंबई महापालिकेवर मोर्चा

नवी मुंबईतल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमधल्या माथाडी कामगारांनी आज नवी मुंबई महापालिकेवर मोर्चा काढला होता. कांदा बटाटा मार्केटच्या इमारतीचा पाणीपुरवठा खंडीत केल्याच्या विरोधात हा मोर्चा होता. बाजार समिती मधल्या अतिधोकादायक इमारतींचा पाणीपुरवठा नवी मुंबई महानगरपालिकेनं खंडीत केला आहे. अतिधोकादायक गाळ्यांमध्ये दुर्घटना झाली तर जबाबदारी घेऊ, असं हमीपत्र लिहून पालिकेला द्यावं अशी सूचना महापालिका आयुक्त कैलास शिंदे यांनी आंदोलकांना केली. हे हमीपत्र मिळाल्यानंतर मार्केटमधील पाणी पुरवठा सुरू केला जाईल...