May 19, 2025 3:08 PM

views 22

नंदुरबार जिल्ह्यात एकाच दिवशी दोन ट्रक उलटून अपघात

नंदुरबार जिल्ह्याच्या नवापूर तालुक्यातल्या चरणमाळ घाटात एकाच दिवशी दोन ट्रक उलटून अपघात झाले. मालेगावहून सुरतला म्हशीची रेडकं घेऊन जाणारा ट्रक चालकाचं नियंत्रण सुटल्यानं दरीत कोसळला. त्यात २६ रेडकं दगावली. गंभीररीत्या जखमी झालेल्या चालकाला प्रथमोपचार देऊन पुढच्या उपचारांसाठी रुग्णालयात नेलं.   त्याच घाटात काही तासांपूर्वी आंध्रप्रदेशातून सुरतकडे संत्री घेऊन जाणारा ट्रक ब्रेकमधे बिघाड झाल्यानं उलटला होता.  चालकाला किरकोळ दुखापत झाली.

November 3, 2024 3:57 PM

views 17

नंदुरबार जिल्ह्यात भरधाव जीपनं दिलेल्या धडकेत पाच जणांचा मृत्यू

नंदुरबार जिल्ह्यात भरधाव जीपनं दिलेल्या धडकेत पाच जणांचा मृत्यू झाला. काल रात्री उशीरा नंदुरबार ते धानोरा रस्त्यावर लोय पिंपळोद गावाजवळ हा अपघात झाला. रस्त्याच्या कडेला नादुरुस्त दुचाकीजवळ उभ्या असलेल्यांना भरधाव गाडीनं धडक दिली. यात १२ ते ४० वर्ष वयोगटाल्या पाच जणांचा मृत्यू झाला. या अपघातात एक जण गंभीर जखमी असून त्याला नंदुरबार इथं जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असल्याची माहिती, आमच्या वार्ताहरानं दिली आहे.