July 11, 2024 7:33 PM

views 55

समृद्धी महामार्गाला वर्षभरात भेगा पडल्या – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले

भ्रष्टाचारामुळे पंचावन्न हजार कोटी रुपये खर्च करुन बांधलेल्या मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाला वर्षभरात भेगा पडल्या आहेत,  असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. ते विधीमंडळ परिसरात आज  प्रसारमाध्यमांशी बोलत होते. केंद्रात आणि राज्यात भाजपा सरकार असून सुद्धा  मराठा आणि धनगर आरक्षणाच्या  मुद्द्यावर सत्ताधारी पक्षानं काल सदनात गोंधळ केला.  त्या गोंधळात पुरवणी मागण्या मान्य  करुन सरकारने लोकशाहीचा खून केला आहे अशी टीकाही पटोले यांनी केली.

July 5, 2024 7:46 PM

views 56

सरकारने फेरीवाल्यांबद्दल ठोस धोरण आखावं – काँग्रेस नेते नाना पटोले

सरकारने फेरीवाल्यांबद्दल ठोस धोरण आखावं तोवर सध्या ऐन पावसाळ्यात फेरिवाल्यांवर होत असलेली कारवाई तात्काळ थांबवावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. मुंबईसह राज्यातल्या इतर शहरात अंदाजे ३० लाख फेरीवाले आहेत. २०१४ साली लोकसभेने फेरीवाल्यांसदर्भात कायदा केला. पण तेव्हापासून गेल्या १० वर्षात राज्यातल्या फेरीवाल्यांना कायदेशीर संरक्षण मिळालेलं नाही असं नाना पटोले म्हणाले.   तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सरकार एकीकडे फेरीवाल्यांना १० हजार ...

June 24, 2024 6:35 PM

views 61

राज्य सरकारनं शेतकऱ्यांचं कर्ज सरसकट माफ करावं – नाना पटोले

राज्य सरकारनं शेतकऱ्यांचं कर्ज सरसकट माफ करावं, आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांना दूधाचे दर वाढवून द्यावेत, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते. तेलंगणात काँग्रेस सरकारनं शेतकऱ्यांचं सरसकट २ लाख रुपयांचं कर्ज माफ केलं आहे. त्याप्रमाणे येत्या २७ तारखेला सुरु होणाऱ्या विधिमंडळ अधिवेशनात राज्य सरकारनं शेतकऱ्यांच्या कर्ज माफीची घोषणा करावी, असं ते म्हणाले.    विविध राज्यांमधे दुधाला ४५ रुपयांपर्यंत भाव मिळत आहे, पण महाराष्ट्रात फक्त २७ रुप...