May 19, 2025 6:52 PM

views 86

नागपूर : OCW नं यंत्रणेत सुधारणा करावी, अन्यथा कारवाई होणार – नितीन गडकरी

नागपूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ओसीडब्ल्यूनं त्यांच्या यंत्रणेत एक महिन्याच्या आत सुधारणा करावी, अन्यथा कारवाई केली जाईल, असा इशारा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज अधिकाऱ्यांना दिला. पालिकेच्या सभागृहात केंद्रीय मंत्री गडकरी आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पाणीपुरवठा आणि नागनदी प्रकल्पासह विविध कामांचा आढावा घेतला. या बैठकीत गडकरी यांनी नागपूर महानगरपालिकेच्या कार्यपद्धतीवरही नाराजी व्यक्त केली. 

April 15, 2025 8:02 PM

views 99

नागपुरात २४ एप्रिलपासून १००व्या नाट्य संमेलनाचं आयोजन

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या १०० व्या नाट्य संमेलनाअंतर्गत नागपूर विभागाचं नाट्य संमेलन येत्‍या, २४ एप्रिल ते २७ तारखेदरम्यान नागपुरात कविवर्य सुरेश भट सभागृहात केलं आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्‍यक्ष प्रशांत दामले यांनी नागपुरात  वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली.    या संमेलनात व्यावसायिक नाटक, लोककलेवरचे कार्यक्रम, स्थानिक शाखा आणि कलावंतांचे सादरीकरण तसेच बाल कलावंतांची विशेष प्रस्तुती असणार आहे. 

March 30, 2025 1:58 PM

views 65

नागपुरात प्रधानमंत्र्यांच्या हस्ते माधव नेत्रालयाच्या प्रीमियम सेंटरचं भूमिपूजन

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नागपूर इथल्या माधव नेत्रालयाच्या प्रीमियम सेंटरचं भूमिपूजन झालं. नागपुरात माधव नेत्रालय गोळवलकर गुरूजी यांच्या आदर्शानुसार लाखो लोकांची सेवा करत असून नागपुरात आज आपण एका पुण्यसंकल्पाचे साक्षीदार बनत आहोत, असं यावेळी ते म्हणाले. देशवासियांना चांगल्या आरोग्य सुविधा देणं ही आपली प्राथमिकता आहे, आयुष्मान भारत सारख्या योजनांद्वारे नागरिकांना मोफत उपचार दिले जात आहेत, असं प्रधानमंत्री म्हणाले.    वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या वाढली आहे, मेडिकलच्या जागा...

March 29, 2025 7:42 PM

views 74

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या नागपूर दौऱ्यावर

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गुढीपाडव्यानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. रेशीमबागेतल्या स्मृती मंदिरात ते डॉ केशव बळिराम हेडगेवार यांना आदरांजली वाहतील. त्यानंतर दीक्षाभूमीलाही भेट देऊन ते आदरांजली वाहणार आहेत. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते नागपूरमध्ये माधव नेत्रालयाच्या विस्तार केंद्राची पायाभरणी होणार आहे. याठिकाणी ते नागरिकांना संबोधित करणार आहेत. प्रधानमंत्री नागपूरमधील सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस लिमिटेडच्या ड्रोनसाठीच्या धावपट्टी सुविधेचं उ...

March 27, 2025 8:45 PM

views 66

प्रधानमंत्र्यांचं नागपुरात भव्य स्वागत करण्याच्या सूचना

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी माधव नेत्रालयाच्या विस्तारित इमारतीच्या भूमिपूजनासाठी ३० मार्च रोजी नागपुरात येत आहेत. त्यावेळी त्यांचं भव्यदिव्य स्वागत करा, अशा सूचना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या. प्रधानमंत्र्यांच्या स्वागताच्या तयारीसाठी प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठक शहरातल्या महाल भागात झाली, तिला बावनकुळे यांनी संबोधित केलं.

March 23, 2025 7:06 PM

views 59

नागपूरमधे हिंसाचारानंतर लागू केलेली संचारबंदी पूर्णपणे उठवली, मात्र पोलीस बंदोबस्त कायम

नागपूरमधे गेल्या आठवड्यात झालेल्या हिंसाचारानंतर लागू केलेली संचारबंदी आता पूर्णपणे उठवली आहे. नागपूरचे पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांनी आज दुपारी ३ वाजल्यापासून संचारबंदी पूर्णपणे उठवण्याचे आदेश जारी केले.   गेल्या सोमवारी झालेल्या हिंसक प्रकारानंतर कोतवाली, गणेशपेठ, तहसील, लकडगंज, पाचपावली, शांतिनगर, सक्करदरा, नंदनवन, इमामवाडा, यशोधरानगर आणि कपिलनगर या ११ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत संचारबंदी लागू केली होती. त्यापैकी काही भागातली संचारबंदी २० मार्चला, तर आणखी काही भागातली संदारबंदी काल उठवली...

March 22, 2025 2:47 PM

views 64

नागपूर हे शांततेचं प्रतीक – माणिकराव ठाकरे

देशाच्या मध्यभागी असलेलं नागपूर हे शांततेचं प्रतीक आहे, इथं कधीही दंगली झाल्या नाहीत. हिंदू-मुस्लिम समाजाचं अतूट प्रेमाचं नातं या शहरात आहे. हे नातं तोडण्याचे प्रयत्न यशस्वी होऊ देता कामा नये, असं आवाहन काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे यांनी आज नागपूर इथं केलं.   काँग्रेस सत्यशोधन समितीनं नागपूर हिंसाचार प्रकरणाचा आढावा घेतल्यानंतर आयोजित वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाला असा मोर्चा काढण्याची परवानगी का दिली आणि त्या मोर्चात झालेल्या आक्षेपार्ह कृती पोलिसांनी वे...

March 20, 2025 6:59 PM

views 68

नागपूर हिंसाचार प्रकरणी फहीम खान याच्यासह ६ जणांविरुद्ध राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल   

  नागपूर दंगलींचा सूत्रधार फहीम खान याच्यासह ६ जणांविरोधात राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी फेसबुक, एक्स, यू ट्यूब आणि इतर समाजमाध्यमांवरच्या सुमारे २३० प्रक्षोभक पोस्ट आढळल्या आहेत, असं  सायबर सेलचे उपायुक्त लोहित मतानी यांनी वार्ताहर परिषदेत सांगितलं.      या दंगलीनंतर परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी ११ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत संचारबंदी लागू केली होती. परिस्थितीचा आढावा घेऊन  नंदनवन, आणि कपिलनगर या पोलीस ठाण्याच्या हद्दीतली संचारबंदी पूर्णपणे उठवली आहे. तर लकडगंज, पाचपावली, श...

March 19, 2025 7:31 PM

views 31

औरंगजेब कबर प्रकरणी फहीम खान यांना अटक

औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनानंतर सोमवारी नागपूर पोलिस ठाण्याबाहेर निदर्शनं केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचे नेते फहीम खान यांना अटक केल्याचं वृत्तसंस्थेनं दिलेल्या बातमीत म्हटलं आहे. दंगल भडकवण्यात खान यांची काही भूमिका होती का, याचा तपास सुरू असल्याचं पोलीस आयुक्त सिंगल यांनी सांगितलं.

March 9, 2025 6:48 PM

views 56

पतंजली फूड आणि हर्बल पार्कचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

पतंजलि अन्न प्रकिया प्रकल्पाचा लाभ छोट्या शेतकऱ्यांना होणार असल्याचं  मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी म्हटलं आहे. नागपूरच्या मिहान इथं उभारलेल्या पतंजली फूड अँड हर्बल पार्कचं उद्घाटन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस आणि केंद्रीय रस्ते आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झालं. या प्रकल्पासाठी राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करणार असून संत्र्यासाठी आवश्यक असणारी दर्जेदार कलमं तयार करण्यासाठी पतंजली आणि राज्यशासन सर्व सुविधांनी युक्त आधुनिक नर्सरी उभारेल, असंही त्यांनी सांगितलं.    या प्र...