December 16, 2025 3:05 PM
101
२९ महानगरपालिकांचे महापौर हे महायुतीचेच, बावनकुळेंचा विश्वास
राज्यात महायुती ५१ टक्के मताधिक्य घेऊन महानगरपालिका निवडणुका जिंकेल आणि २९ महानगरपालिकांचे महापौर हे महायुतीचेच होतील असा विश्वास भाजपचे नेते आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज व्यक्त केला. नागपूरच्या कोराडी येथे प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते. अमरावतीमध्ये युवा स्वाभिमान हा पक्ष आमचा मित्र पक्ष असून अमरावतीमध्येसुद्धा महायुतीच लढणार असं त्यांनी स्पष्ट केलं.