January 9, 2026 3:39 PM

views 131

महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी AIसह डिजिटल माध्यमांचा वापर

महाराष्ट्रातल्या महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराला आता वेग आला आहे. उमेदवार तसंच सर्व पक्षांचे नेते मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी डिजिटलं उपकरणं, तंत्रज्ञानासह विविध माध्यमांचा उपयोग करत आहेत. पदयात्रा, रॅली आणि सभा या पारंपरिक पद्धतींसह निवडणूक प्रचारात आता कृत्रिम बुद्धिमत्तेचाही समावेश झाला आहे. पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रचार करण्यासाठी भाजपाने एआयचा वापर करून केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध कल्याणकारी योजना मतदारापर्यंत पोहोचवण्याची मोहीम सुरू केली आहे. तर काँग्रेस पक्षही समाजमाध्यमा...

January 9, 2026 3:12 PM

views 91

परळी नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि MIM सत्तेत एकत्र आल्याचा अंबादास दानवे यांचा दावा, शिवसेनेकडून खंडण

परळी नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि MIM या पक्षांनी एकत्र येऊन सत्ता स्थापन केली असल्याचा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी केला आहे. मात्र शिवसेना नेते संजय शिरसाठ यांनी हा आरोप फेटाळून लावला आहे. शिवसेनाच MIM ला हद्दपार करेल. त्यामुळं त्यांनी अधिक माहिती घ्यावी, असा सल्ला शिरसाठ यांनी दानवे यांना दिला.   या नगरपालिकेत एकूण ३५ जागा आहेत. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे १६, शिवसेनेचे २ आणि MIM चा एक नगरसेवक यांनी एकत्र येऊन गट स्थापन केला आहे. तर...

January 5, 2026 3:42 PM

views 142

बिनविरोध निवडलेल्या उमेदवारांनी पैसा आणि धाकदपटशाचा वापर केल्याचा काँग्रेसचा आरोप

महानगरपालिका निवडणुकीत महायुतीने आपले उमेदवार बिनविरोध निवडून आणल्याचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी निषेध केला. हे उमेदवार लोकप्रिय आहेत, म्हणून बिनविरोध निवडलेले नसून पैसा आणि धाकदपटशाच्या जोरावर झालेले आहेत, अशी टीका सपकाळ यांनी केली आहे. मुंबईत पत्रकार परिषदेत ते बोलत होते.     विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कार्यालयात कार्यरत असलेले बहुतांश अधिकारी हे भ्रष्ट असल्याचा आरोपही सपकाळ यांनी केला. या संदर्भातला अहवाल मिळूनही निवडणूक आयोगाने कुठलीही कारवाई केलेली नाह...