April 11, 2025 1:29 PM

views 57

२६-११च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातला आरोपी तहव्वूर राणा याला १८ दिवसांची पोलिस कोठडी

२६-११च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातला आरोपी तहव्वूर राणा याला १८ दिवसांची पोलिस कोठडी पटियाला हाऊन न्यायालयाने दिली आहे. तहव्वूर राणाचं काल भारताकडे प्रत्यार्पण झालं.   राष्ट्रीय तपास संस्थेचं पथक काल संध्याकाळी विशेष विमानानं त्याला घेऊन नवी दिल्लीत पोहोचलं. त्यानंतर त्याला पटियाला हाऊस न्यायालयात हजर करण्यात आलं. तहव्वूर राणा याला मुंबई हल्ल्याप्रकरणी २००९मध्ये अमेरिकेत अटक झाली होती. या हल्ल्याचा सूत्रधार डेव्हिड हेडली याला मदत केल्याचा ठपका त्याच्यावर आहे.   राणाचं प्रत्यार्पण हे कें...

April 9, 2025 9:26 PM

views 58

मुंबई २६/११ दहशतवादी हल्ल्यातला आरोपी तहव्वुर राणा भारतात येणार

मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातला आरोपी तहव्वुर राणा याला भारतात आणलं जात असल्याचं वृत्त आहे. तो अमेरिकेतल्या तुरुंगात होता. भारतीय अधिकाऱ्यांनी त्याची कोठडी घेतली असून ते भारताकडे निघाले आहेत. काही महिन्यांपूर्वी राणा याच्या प्रत्यार्पणाला मंजुरी मिळाली होती. या निर्णयाला आव्हान देणारी त्याची याचिका अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयानं काही काळापूर्वी फेटाळली होती. 

November 26, 2024 1:40 PM

views 42

२६/११ च्या हल्यातल्या हुतात्म्यांना आदरांजली

सव्वीस अकराच्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलिस अधिकारी आणि जवानांचा आज सोळावा स्मृतीदिन. मुंबई पोलिस मुख्यालयात, राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  आणि  अजित पवार  यांनी  या हल्ल्यातल्या हुतात्म्यांना पुष्पचक्र वाहून आदरांजली व्यक्त केली. हुतात्म्यांचे कुटुंबीय आणि उपस्थित आजी-माजी पोलिस अधिकाऱ्यांची भेट राज्यपालांनी यावेळी घेतली. यावेळी उपस्थित इतर मान्यवर, पोलीस अधिकारी आणि जवानांनी हुतात्म्यांना अभिवादन केलं.