January 20, 2026 8:45 PM

views 302

शेअर बाजारात मोठी घसरण

अमेरिकेकडून वारंवार दिली जाणारी आयात शुल्क वाढीची भिती,  कमकुवत होणारा रुपया यासारख्या कारणांमुळं देशातल्या शेअर बाजारात आज मोठी घसरण झाली.  दिवसअखेर सेन्सेक्स १ हजार ६६ अंकांनी घसरुन ८३ हजारांच्या खाली जाऊन ८२ हजार १८० अंकांवर बंद झाला. व्यवहारा दरम्यान हा निर्देशांक ८२ हजारांच्या पातळीखाली जाण्याचीही भिती निर्माण झाली होती. निफ्टी ३५३ अंकांची घट नोंदवून २५ हजार २३२ अंकांवर स्थिरावला. जागतिक बाजारपेठेतली घसरण, मोठ्या कंपन्यांच्या समभागांच्या घसरलेल्या किंमती यामुळंही बाजारात घसरण दिसून आली.  

September 25, 2024 7:02 PM

views 85

मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सनं ८५ हजारांची पातळी ओलांडली

जागतिक बाजारातल्या तेजीमुळं देशातल्या दोन्ही शेअर बाजारांनी आज विक्रमी पातळी गाठली. सेन्सेक्स पहिल्यांदाच ८५ हजारांच्या वर आणि निफ्टी पहिल्यांदाच २६ हजारांच्या वर जाऊन बंद झाले. घसरणीसह सुरू झालेल्या शेअर बाजारात अखेरच्या अर्धा तासात जोरदार तेजी दिसून आली. दिवसअखेर सेन्सेक्स २५६ अंकांची तेजी नोंदवून ८५ हजार १७० अंकांवर बंद झाला. निफ्टी ६४ अंकांची वाढ नोंदवून २६ हजार ४ अंकांवर स्थिरावला.

August 5, 2024 7:30 PM

views 104

शेअर बाजारात मोठी घसरण

शेअर बाजारात आज मोठी घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज २ हजार २२३ अंकांनी घसरून ७८ हजार ७५९ अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही ६६२ अंकांची घसरण नोंदवत २४ हजार ५६ अंकांवर बंद झाला. जपानचा शेअर बाजार निक्केई कोलमडल्यानं संपूर्ण जगभरातल्या शेअर बाजारात आज घसरण पाहायला मिळाली. याचा सर्वाधिक प्रभाव आशियातल्या शेअर बाजारांवर दिसून आला. बाजारातली पडझड रोखण्यासाठी दक्षिण कोरियानं २० मिनिटं व्यवहार बंद केले होते. चीन आणि हाँगकाँग यांच्या शेअर बाजारांवर मात्र या पडझडीचा परिणाम...

July 19, 2024 7:31 PM

views 89

मुंबई शेअर बाजार : सेन्सेक्समधे ७३९ , तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत २७० अंकांची घसरण

शेअर बाजारातल्या गेल्या ४ सत्रांमधल्या तेजीला आज आळा बसला. आज सकाळच्या सत्रात दोन्ही निर्देशांकांनी विक्रमी उंची गाठली होती. मात्र ही तेजी फार काळ टिकू शकली नाही. गुंतवणूकदारांनी विक्रीवर भर दिल्यामुळे बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ७३९ अंकांनी घसरला आणि ८० हजार ६०५ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही २७० अंकांची घसरण नोंदवत २४ हजार ५३१ अंकांवर बंद झाला.   धातू, वाहन उद्योग, आर्थिक सेवा आणि ऊर्जा क्षेत्राच्या समभागांनी मोठी घसरण नोंदवली. जागतिक बाजारातली कमकुव...

July 5, 2024 8:13 PM

views 100

मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकांत ५३ अंकांची घसरण

मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकांत आज दिवसअखेर ५३ अंकांची घसरण झाली आणि तो ७९ हजार ९९६ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही २२ अंकांची वाढ नोंदवत २४ हजार ३२४ अंकांवर बंद झाला.

July 4, 2024 7:35 PM

views 100

मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स पहिल्यांदाच ८० हजाराच्या उच्चांकी पातळीवर बंद

मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज पहिल्यांदाच ८० हजाराच्या उच्चांकी पातळीवर बंद झाला. कालच सेन्सेक्सनं ही पातळी ओलांडली होती, मात्र दिवसअखेर तो या पातळीखाली बंद झाला होता. आज दिवसअखेर ६३ अंकांची वाढ नोंदवत तो ८० हजार ५० अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही १६ अंकांची वाढ नोंदवत २४ हजार ३०२ अंकांवर बंद झाला. 

July 3, 2024 7:33 PM

views 101

शेअर बाजार निर्देशांकानं ओलांडली ८० हजारांची उच्चांकी पातळी

मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकानं आज व्यवहार सुरु होतानाच जोरदार उसळी घेत विक्रमी ८० हजारांचा टप्पा पार केला. शेअर बाजाराची ही आतापर्यंतची उच्चांकी पातळी आहे. सेंसेक्स ५७२ पूर्णांक ३२ अंकांच्या वाढीसह ८० हजार १३ अंकांवर उघडला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी देखील १६७ अंकांच्या वाढीसह २४ हजार २९१ पूर्णांक ७५ अंकांवर उघडला.