December 30, 2024 8:18 PM

views 40

नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबई रेल्वे आणि बेस्टकडून अतिरीक्त गाड्या

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी प्रवाशांच्या सोयाीसाठी मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे उद्या रात्री विशेष उपनगरीय रेल्वे गाड्या चालवणार आहे. मध्य रेल्वेवर विशेष गाडी सीएसएमटी स्थानकातून आणि कल्याणहून रात्री दीड वाजता सुटेल. हार्बर मार्गावर विशेष गाडी सीएसएमटी आणि पनवेल इथून पहाटे दीड वाजता सुटेल. पश्चिम रेल्वेवर देखील चर्चगेट आणि विरार दरम्यान ८ विशेष गाड्या चालवल्या जातील. चर्चगेटहून ही गाडी रात्री सव्वा वाजता, २ वाजता, अडीच वाजता आणि ३ वाजून २५ मिनीटांनी सुटेल. तर विरारहून पहाटे सव्वा बारा वाजता, पाऊ...