November 5, 2025 3:48 PM

views 51

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ६ तास बंद!

देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी येत्या २० नोव्हेंबर रोजी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरचं कामकाज सहा तास थांबवण्यात येणार आहे. सकाळी ११ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत दोन्ही धावपट्ट्या तात्पुरत्या बंद राहतील. या दरम्यान धावपट्ट्यांची तपशीलवार तपासणी, पृष्ठभागांची दुरुस्ती, प्रकाशयोजना, चिन्हं तसंच सांडपाणी व्यवस्थेचं तांत्रिक मूल्यांकन केलं जाणार आहे.

February 20, 2025 7:28 PM

views 29

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ५६ कोटींच्या गांजासह ५ जणांना अटक

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर काल सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी ५ प्रवाशांकडून ५६ किलो २६० ग्रॅम वजनाचा गांजा गांजा जप्त केला. या गांजाची किंमत अंदाजे ५६ कोटी २६ लाख रुपये इतकी आहे. हे पाचही प्रवासी बँकाकहून मुंबईला आले होते. त्यांना अटक करण्यात आली आहे.

February 2, 2025 12:22 PM

views 45

मुंबई अंतरराष्ट्रीय विमानतळावर एक किलो ६४९ ग्रॅम वजनाचे अंमली पदार्थ जप्त

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज अंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी एका प्रवाशाकडून काल एक किलो ६४९ ग्रॅम वजनाचे अंमली पदार्थ जप्त केले. त्याचं आंतरराषट्रीय बाजार पेठेतलं मूल्य अंदाजे १६ कोटी ४९ लाख रुपये इतकं आहे. पॅरिसमार्गे मुंबईला आलेल्या प्रवाशाकडून  पांढऱ्या रंगाच्या १७० कॅप्सूल जप्त करण्यात आल्या, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.