May 22, 2025 2:58 PM

views 70

IPL 2025 : मुंबई इंडियन्स संघ बाद फेरीत दाखल

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघानं बाद फेरीतलं स्थान मिळवलं आहे. मुंबईच्या वानखेडे मैदानावर काल झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघानं दिल्ली कॅपिटल्स संघावर ५९ धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना मुंबईच्या संघानं २० षटकांत १८० धावा केल्या. दिल्ली संघाचा डाव १८ षटकं आणि २ चेंडूत १२१ धावांवर आटोपला.   आज अहमदाबाद इथं गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंटस् यांच्यात सामना होणार आहे. खेळ संध्याकाळी साडेसात वाजता सुरु होईल. गुजरात टायटन्स संघ आधीच बाद फेरीत दाखल झाला आहे. 

April 17, 2025 2:01 PM

views 41

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत मुंबई इंडियन्सचा सामना आज सनरायर्जस हैदराबाद बरोबर होणार

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत मुंबई इंडियन्सचा सामना आज सनरायर्जस हैदराबाद बरोबर होईल. मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमवर संध्याकाळी साडे सात वाजता या सामन्याला सुरुवात होईल.

April 5, 2025 8:44 AM

views 54

आयपीएल – लखनऊ सुपर जायंटस् संघाचा मुंबई इंडियन्स संघावर 12 धावांनी विजय

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल लखनऊ सुपर जायंटस् संघानं मुंबई इंडियन्स संघावर 12 धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना लखनऊच्या संघानं 20 षटकांत 8 गडी बाद 203 धावा केल्या. त्याला प्रत्युत्तर देताना मुंबईच्या संघाला 5 गडी बाद 191 धावा करता आल्या.

April 1, 2025 9:05 AM

views 38

मुंबई इंडियन्स संघाचा कोलकाता नाइट रायडर्सवर दणदणीत विजय

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल मुंबईच्या वानखेडे मैदानावर झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघानं कोलकाता नाइट रायडर्सवर 8 गडी आणि 43 चेंडू राखून दणदणीत विजय मिळवला. त्यापूर्वी मुंबई इंडियन्सनं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. आणि कोलकाता नाइट रायडर्स संघाला 17 व्या षटकात ११६ धावांवर सर्वबाद केलं. 117 धावांच हे लक्ष्य मुंबईने केवळ दोन गड्याच्या मोबदल्यात १3व्या षटकातच पूर्ण केल. रायन रुकेलटन यांनं ४१ चेंडूत ६२ धावा तर सुर्यकुमार यादवनं ९ चेंडूत २७ धावा करत विजयी भागिदारी केली. आज लखनौ स...

March 15, 2025 12:49 PM

views 45

महिला क्रिकेट प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये अंतिम सामना

महिला प्रीमियर लीग क्रिकेट च्या अंतिम फेरीत आज मुंबई इंडियन्स चा सामना दिल्ली कॅपिटल्स शी होणार आहे. मुंबईत ब्रेबॉन स्टेडियम वर सायंकाळी साडे सात वाजता हा सामना सुरु होईल. दोन्ही संघांनी आठ पैकी ५ सामने जिंकले असून गुणफरकाच्या आघाडीमुळे दिल्ली कॅपिटल्स संघ गुणतालिकेत प्रथम स्थानी तर मुंबई इंडियन्स दुसऱ्या स्थानी आहे. दिल्ली कॅपिटल्स संघ सलग तिसऱ्या वेळी अंतिम फेरीत पोहोचला आहे.