April 27, 2025 1:44 PM

views 48

राष्ट्रीय सुरक्षिततेच्या हितासाठी सावधगिरी बाळगण्याचे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे निर्देश

देशातल्या सर्व दूरचित्रवाहिन्या, वृत्तसंस्था आणि समाजमाध्यम वापरकर्ते यांनी राष्ट्रीय सुरक्षिततेच्या हितासाठी सावधगिरी बाळगण्याचे आणि विद्यमान कायदे आणि नियमांचं काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं दिले आहेत. या संदर्भात काढण्यात आलेल्या अधिसूचनेत संरक्षणविषयक कारवाईशी संबंधित, कोणत्याही प्रकारचं प्रत्यक्ष दृश्य प्रसारण किंवा स्रोत आधारित माहिती प्रसारित केली जाऊ नये असं स्पष्टपणे सांगितलं आहे. संवेदनशील माहिती उघड केल्याचा शत्रूला फायदा होऊन आपल्या संरक्षण दलांची कार...

December 22, 2024 8:11 PM

views 34

अमरावतीत IIMC उभारणीसाठी २७ डिसेंबरपर्यंत निविदा दाखल करता येईल – माहिती आणि प्रसारण मंत्रालय

अमरावती जिल्ह्यात बडनेरा इथं उभारण्यात येणाऱ्या IIMC अर्थात  भारतीय जनसंचार संस्थेच्या उभारणीसाठी निविदा मागवल्या जात असून २७ डिसेंबरपर्यंत निविदा दाखल करता येतील असं माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांनी सांगितलं. नागपूर इथं  आकाशवाणी, दूरदर्शन, पत्र सूचना कार्यालय, केंद्रीय संचार ब्युरो या कार्यालयाच्या प्रमुखांची बैठक झाली, यावेळी जाजू बोलत होते.  केंद्रीय लोक निर्माण विभाग नागपूरचे मुख्य अभियंता प्रदीप दीक्षित यांच्याकडून जाजू यांनी IIMC च्या बांधकामाचा आढावा घेतला. इमारतीच्या ...

November 6, 2024 7:25 PM

views 81

पुढच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन परिषदेचं आयोजन

भारताला जगात आशयनिर्मिती आणि निर्यातीचं मोठं केंद्र बनवण्याच्या उद्देशानं पुढच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात वेव्ह, अर्थात जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन परिषदेचं आयोजन नवी दिल्लीत होणार असल्याची माहिती, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांनी आज मुंबईत दिली. विविध चित्रपट निर्मिती संस्था, स्टुडिओ, गेमिंग, ॲनिमेशन, चित्रपट इत्यादी क्षेत्रांतल्या प्रतिनिधींशी त्यांनी संवाद साधला.

September 16, 2024 3:25 PM

views 62

चित्रपटगृहात दृष्टीहीन आणि कर्णबधिर प्रेक्षकही चित्रपटांचा आनंद लुटणार

दृष्टीहीन आणि कर्णबधिर प्रेक्षकांना चित्रपटांचा आनंद लुटता यावा याकरता चित्रपटगृहात विशिष्ट यंत्रणा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्याकरता माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळाकडून ई सिनेप्रमाणन या यंत्रणेमधून प्रदर्शनाचं प्रमाणपत्र मिळवताना चित्रपटाला सबटायटल्सची सुविधा किंवा चित्राच्या वर्णनाची जोड देणारी ध्वनीफीत जोडलेली असणं आवश्यक राहील. या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करण्यासाठी कालपर्यंत मुदत होती. तोपर्यंत सर्वत्...