January 27, 2025 1:20 PM

views 27

परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर ३ दिवसांच्या संयुक्त अरब अमिरातीच्या दौऱ्यावर

परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर आजपासून ३ दिवसांच्या संयुक्त अरब अमिरातीच्या भेटीवर जात आहेत. या भेटीदरम्यान ते दोन्ही देशांच्या दृढ भागीदारीचा आढावा घेतील तसंच परस्पर संबंध आणखी दृढ करण्याच्या नव्या क्षेत्रांबद्दल चर्चा करतील. परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांचा हा दौरा दोन्ही देशातली धोरणात्मक भागीदारी पुढे नेण्याची संधी देईल तसंच परस्पर संबंधांना गती देईल, असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या पत्रकात नमूद करण्यात आलं आहे.

December 7, 2024 8:06 PM

views 33

जगात कुठेही भू-राजकीय संघर्ष झाला तरी भारतावर त्याचे थेट परिणाम होतात-एस जयशंकर

जगात कुठेही भू-राजकीय संघर्ष झाला तरी भारतावर त्याचे थेट परिणाम होतात असं परराष्ट्रव्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. कतारमधे दोहा फोरम २०२४ या चर्चासत्रात संघर्ष समेटाचं नवीन युग या विषयावर ते बोलत होते. भूमध्य सागरी प्रदेशात भारतीय वंशाचे सुमारे ५० हजार लोक राहतात, तर आखाती देशांमधे ही संख्या एक कोटीच्या आसपास आहे असं त्यांनी सांगितलं. आंतरराष्ट्रीय संघर्षात भारताची भूमिका पारंपरिक मध्यस्थ म्हणून सीमित नाही तर संघर्षग्रस्त देशात संवादसुरु करण्यासाठी पुढाकार घेण्याची आहे असं ते रशिया यु...

September 7, 2024 7:52 PM

views 61

मंत्री एस. जयशंकर उद्यापासून दोन दिवसांच्या रियाध आणि सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर

परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर उद्यापासून दोन दिवसांच्या रियाध आणि सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर जात आहेत. यावेळी ते पहिल्या भारत आखात सहकार्य मंडळाच्या सदस्य देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या परिषदेला उपस्थित राहणार आहेत. या दौऱ्यात ते सहभागी देशाच्या परराष्ट्र मंत्र्याशी द्विपक्षीय चर्चाही करतील. आखाती देश हे भारताचे सर्वाधिक मोठे व्यापारी भागीदार असून या देशांमध्ये ८ कोटींहून अधिक भारतीय राहात आहेत. यानंतर ते दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी बर्लिन इथं जात आहेत. हा त्यांचा तिसरा जर्मनी दौरा आहे.